गडचिराेली : बाराही तालुके मिळून जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या जवळपास १ हजार ४६४ शाळा असून यामध्ये प्राथमिक शिक्षकांची एकूण ४ हजार ३३१ पदे मंजूर आहेत. यापैकी ३ हजार ८२५ पदे भरण्यात आली असून बऱ्याच दिवसांपासून ५०६ पदे रिक्त आहेत. पदे रिक्त, अतिरिक्त शिक्षक त्यांचे समायोजन याचा लेखाजोखा पाहिल्यास जि. प. शाळांच्या शिक्षक संख्येचे गणित बिघडल्याचे दिसून येत आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, देसाईगंज हे चार तालुके साेडले तर इतर आठ तालुक्यातील शिक्षणाची भिस्त जि. प. शाळांवरच आहे. मात्र अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वाणवा असल्याने गुणवत्तेवर परिणाम हाेत आहे.
बाॅक्स .......
प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेसाठी मुहूर्त मिळेना
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या पुणे येथील कार्यालयाकडून जि. प. च्या प्राथमिक शाळांची संच मान्यता केली जाते. मात्र गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून संच मान्यता झाली नाही. परिणामी जि. प. शिक्षण विभागाला शिक्षक संख्येचे गणित याेग्यरीत्या जुळविता आले नाही. रिक्त पदे भरणे, शिक्षकांचे समायोजन आदी कार्यवाही थंडबस्त्यात आहे.
बाॅक्स .......
विद्यार्थ्यांचे नुकसान
-अहेरी उपविभागातील सिराेंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व मुलचेरा या पाच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
-एक व दाेन शिक्षकी शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
-पर्यवेक्षिय यंत्रणेला ही रिक्त पदाचे ग्रहण लागले असल्याने शाळा वाऱ्यावर आहेत.
काेट ....
जि. प. प्राथमिक शिक्षकांचे सेवा विषयक प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न साेडविण्याचे साेबतच सर्व शाळांना पुरेसे शिक्षक देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये.
- धनपाल मिसार, जिल्हाध्यक्ष प्राथ. शिक्षक समिती
काेट....
दिवाळी दरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या हाेणार आहेत. त्या अनुषंगाने पाेर्टलचे काम सुरू झाले आहे. प्रशासनाने दुर्गम भागातील शाळांना शिक्षक मिळण्यासाठी याेग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- यशवंत शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्राथ. शिक्षक परिषद