अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात ८ डिसेंबर २०१७ पासून लागू केली झाली आहे. ही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत. या योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे.
बाॅक्स
काेणाला मिळतो लाभ
- १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र आहेत.
- ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जीवित अपत्यापुरतीच मर्यादित आहे. या योजनेचा लाभ एकदाच घेता येते.
- नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ अनुज्ञेय राहील.
- वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला वगळता सर्वच महिलांना या याेजनेचा लाभ घेता येईल.
बाॅक्स
योजनेचा लाभ कसा मिळेल.
- एक हजार रूपयांचा पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात अनुदान जमा केले जाते.
- दाेन हजार रूपयांचा दुसरा हप्ता हा किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मिळते.
- दाेन हजार रूपयांचा तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मत: एक मात्रा बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस बी तसेच पेन्टाव्हॅलेन्टचे ३ व ओपीव्हीच्या ३ मात्रा अथवा समतूल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाते.
तालुकानिहाय लाभार्थी
तालुका लाभार्थी
अहेरी २,८८८
आरमाेरी २,९२८
भामरागड ७८२
चामाेर्शी ४,४४२
धानाेरा २,२००
एटापल्ली १,६८२
गडचिराेली ४,५४३
काेरची १,५३५
कुरखेडा २,७३१
मुलचेरा १,७००
सिराेंचा १,९१६
देसाईगंज २,५९३
एकूण २९,९४०