शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

यांत्रिकीकरणाने मंदावली बैलांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:57 PM

ग्रामीण भागात आजही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी बैलांना धुवून, शिंगांना रंगी-बेरंगी बेगड लावले जातात. झुल पांघरली जाते. सोने जपावे तसा जपून ठेवलेला साज, म्हणजे शिंगोट्या, गळाकंठी, हार बैलावर चढवून वाजत गाजत बैलांना गावातील महादेव मंदिराच्या ठिकाणी नेल्या जाते.

ठळक मुद्देपोळ्याचा उत्साह कायम : कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांना अतिथीचा बहुमान

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वर्षभर आपल्या पाठीवर आसूड झेलून मातीत राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी बळीराजा पुरणपोळीचा नवैद्य देऊन बैलाचा सन्मान करतात. पोळ्याच्या दिवशी बैलाचा मान ‘अतिथी देवो भव’ सारखा असतो. ग्रामीण भागात ही परंपरा आजही जपली जात असली तरी अलिकडे शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची पावलेच मंदावल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागात आजही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी बैलांना धुवून, शिंगांना रंगी-बेरंगी बेगड लावले जातात. झुल पांघरली जाते. सोने जपावे तसा जपून ठेवलेला साज, म्हणजे शिंगोट्या, गळाकंठी, हार बैलावर चढवून वाजत गाजत बैलांना गावातील महादेव मंदिराच्या ठिकाणी नेल्या जाते. त्याच ठिकाणी बैलाचा पोळा भरविला जातो. शंकराच्या मंदिरात बैलजोडी आली की, ‘चाकचाडा बैलगाडा, बैल गेला पवनगडा, पवन गडाहून आणली माती, थे दिली गुरूच्या हाती, एक नमन गौरा पार्वती हरबोला... हरहर महादेव..!’ अशा प्रकारच्या झडत्या म्हणून गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हाताने तोरण तोडून बैलपोळा फोडतात.शिवमंदिराला जोडीमालक बैलासह प्रदक्षिणा घालून बैलजोडी आपल्या घरी नेतो. त्यानंतर घरमालकीन बैलजोडीचे पाय धुवून बैलाला आरतीने ओवाळत असते. त्यानंतर बैलजोडीला पुरणपोळीचे जेवन दिले जाते. बैलजोडीसोबत पुरणपोळीचा आस्वाद घेऊन बैलाचे आभार माणले जाते. पोळ्याच्या दिवशीचा हा ग्रामीण साज यांत्रिकीकरणाच्या काळात हरविला आहे. यांत्रिकी युगात ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजात शेतातील बैलाचे पावले मंदावली आहे. कसायाच्या पाशात पशुधन जात असल्याने दिवसेंदिवस गोधन कमी होत आहे. तरीही ग्रामीण भागातील बैल पोळ्याचा हा साज बºयाच लोकांनी अगदी त्याच प्रेमाने जपला आहे. त्यामुळे आजही पोळ्याच्या झडत्या त्याच जोशात गुंजत आहेत.‘वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी, शेतकरी लढे जन्मभर रास्त भावासाठी, एक नमन गौरा महादेव...’विद्यमान परिस्थितीवर रंगणाऱ्या या झडत्यांना शेतकरी-शेतमजूर चांगलीच दाद देतात. त्यातून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मनातील भावनाही व्यक्त होताना दिसतात. परंतू ट्रॅक्टरची संख्या जसजसी वाढत आहे तसतशी बैलांची संख्याही घटत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी