गडचिराेली : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेवर लक्ष केंद्रीत केल्याने बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. त्यामुळे नीट परीक्षा न घेता वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश दिला तर अशा विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान हाेऊ शकते. त्यामुळे बारावीतील गुणांच्या आधाराऐवजी ‘नीट’ परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात यावी, असे मत शिक्षणतज्ज्ञ व नीट परीक्षेच्या मार्गदर्शकांनी व्यक्त केले आहे.
१५ टक्के काेट्यातून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार आहे. केवळ नीट परीक्षेवर लक्ष देऊन ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यास प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याचा धाेका हाेऊ शकताे. तमिळनाडूप्रमाणे इतर राज्यांनी अनुकरण केल्यास नीट परीक्षेला महत्त्व राहणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा आवश्यक आहे या परीक्षेच्या माध्यमातूनच गुणवत्तेनुसार मेडिकल अभ्यासक्रमाचे प्रवेश व्हावे, असे मत तज्ज्ञ व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केले आहे.
बाॅक्स ......
विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी राज्य सरकारची
- विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविण्याची जबाबदारी देशातील सर्व राज्य सरकारची आहे. त्याची जाणीव ठेवून उचित कार्यवाही हाेणे गरजेचे आहे.
- तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी साेमवारला नीट परीक्षेशिवाय बारावीच्या गुणांच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठीचे विधेयक सादर केले. राजकीय पक्षांकडून या विधेयकाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
बाॅक्स ......
अनेकांनी घडविले वैद्यकीय क्षेत्रात करिअर
- गडचिराेली या मागास जिल्ह्यात सात ते दहा वर्षांपूर्वी एमबीबीएस पदवीधारक डाॅक्टरांची कमतरता हाेती. मात्र, याेग्य मार्गदर्शन, जनजागृती व आपल्या बुद्धिमत्तेच्या जाेरावर जिल्ह्यातील अनेक हुशार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडविले आहे. त्याचा परिणाम गडचिराेली शहरात पूर्वीच्या तुलनेत आता एमबीबीएस झालेल्या डाॅक्टरांची संख्या दुपटीवर वाढली आहे. एमबीबीएस एमडी व एमएस झालेले अनेक डाॅक्टर स्थानिक आहेत.
बाॅक्स
......असा आहे तमिळनाडू सरकारचा निर्णय
राज्यातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तमिळनाडू विधानसभेने मंजूर केले आहे. या विधेयकामुळे सरकारी व खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांवर इयत्ता बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश मिळणार आहे.
काेट .......
धक्कादायक निर्णय
देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर व पारदर्शकपणे व्हावी, या हेतूने नीट परीक्षा घेतली जाते. बारावीतील गुणांवर प्रवेश देणे याेग्य ठरणार नाही. ज्या राज्यांना नीट परीक्षा नकाे आहे त्यांनी कमीत कमी सीईट परीक्षा तरी घ्यावी. जेणेकरून गुणवत्तेला महत्त्व येईल.
- डाॅ. सचिन येनगंधलवार, मार्गदर्शक
तमिळनाडूपूर्वी, तेलंगणा, आंध्रप्रदेश व जम्मू-काश्मीर राज्याने बारावीच्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला हाेता. तेलंगणा, आंध्रप्रदेश सरकारने हा निर्णय रद्द करून नीट परीक्षा स्वीकारली आहे. सर्व राज्यांनी नीटप्रमाणे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबवावी. विद्यार्थ्यांसाठी हिताचे आहे.
- ए. व्ही. एस. शर्मा, मार्गदर्शक
काेट ......
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
ज्या विद्यार्थ्यांनी राज्य बाेर्ड व सीबीएसई अभ्यासक्रमामधून अभ्यास केला आहे. नीटमुळे त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते.
- प्रज्ज्वल चलाख
नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे मेडिकल प्रक्रिया राबवावी. काेराेना संकटामुळे बारावीची अंतिम परीक्षा झाली नसल्याने नीट व्हावी.
- सीमा मडावी