आरमोरी व गडचिरोली येथील तालुका कार्यालयात सोमवारी व्यसन उपचार क्लिनिक आयोजित करण्यात आले. दोन्ही क्लिनिकच्या माध्यमांतून एकूण २७ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला. आरमोरीत १० रुग्णांनी क्लिनिकला भेट दिली. गडचिरोली शहरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात १७ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला. दोन्ही तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण २७ रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आला.
गडचिराेली तालुक्यातील मारोडा येथे मुक्तिपथ अभियानातर्फे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून एकूण १९ रुग्णांची नोंदणी करीत १३ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आले. अरुण भोसले यांनी उपचाराला आलेल्या रुग्णांना समुपदेशन केले. संयोजक प्रमोद कोटांगले यांनी रुग्णांची माहिती घेतली. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक आनंद इंगळे यांनी केले. यशस्वितेसाठी पोलीसपाटील एकनाथ कावळे यांनी सहकार्य केले.
चामोर्शी तालुक्यातील भोगनबोडी हेटी येथे मुक्तिपथ अभियानातर्फे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून एकूण १७ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आले. शिबिरात २५ रुग्णांची नोंदणी करून १७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. अरुण भोसले यांनी उपचाराला आलेल्या रुग्णांना समुपदेशन केले. संयोजक प्रमोद कोटांगले यांनी रुग्णांची माहिती घेतली. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक आनंद इंगळे यांनी केले. यशस्वितेसाठी पोलीसपाटील खुशाल एनरवार, आशावर्कर वैशाली गवारे, मुख्याध्यापक दादाजी नागुलवार यांनी सहकार्य केले.