विविध मागण्यांची पूर्तता १० सप्टेंबर २०२१ पर्यंत न झाल्यास ऑक्टाेबर २०२१ च्या अन्नधान्याची उचल करणार नाही, अशा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत असतात, परंतु त्या बदल्यात आमच्या पदरी निराशाच आली आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांनी चलान भरून मोफत धान्य वाटप केलेले पैसे कमिशनसहित जमा करावे, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० मध्ये वाटप केलेल्या धान्याचे कमिशन देण्यात यावे, दुकानदाराच्या खात्यात १० सप्टेंबर २०२१ पर्यंत कमिशन जमा न झाल्यास ऑक्टोबर २०२१ च्या अन्नधान्याची उचल करणार नाही. तसेच ऑक्टोबरचे धान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध न झाल्यास त्यास स्वस्त धान्य दुकानदार जबाबदार राहणार नाहीत, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना जाकीर कुरेशा, सचिव नरेन्द्र उईके, समीर कुरेशा, जमिग शेख आदी हजर हाेते.
260821\58311957-img-20210826-wa0046.jpg
तहसीलदार पिततुळवार याना निवेदन