श्रावणात मंदिरात भजन, कीर्तन, अभिषेक, मंत्रोपचाराचा जयघोष सुरू होतो. परंतु मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे थैमान घातल्याने ही परंपरा खंडित झाली आहे. श्रावण महिन्यात गावागावात कीर्तन, प्रवचन , हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते परंतु गावोगावी निनादणारा भजन , कीर्तनाचा व टाळ-मृदंगाचा गजर हरपल्याचे दिसू लागले आहे. वारकरी सांप्रदायाची भगवी पताका घेऊन अखंड हरिनामाची अनेक वर्षांची परंपरा मागील दीड वर्षांपासून खंडित झाली आहे.
श्रावण महिन्यात आबालवृद्ध दिवसभर काबाडकष्ट करूनसुद्धा जेवणानंतर भजनकरी एकत्र येउन जुने भजन गायचे. त्यामुळे साधू,संत यांच्या आठवणीला उजाळा मिळत असे. एवढेच नव्हे तर काही गावांत श्रावण महिन्यात हनुमान मंदिरात पोथी, पुराण, यांचे वाचन केले जात असते आणि ती ऐकण्यासाठी महिला व पुरुष एकत्र बसून धार्मिक कथा, कहाणी, मुखोद्गत करत असत तसेच श्रावणातील शेवटच्या दिवशी गोपालकाला करून मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रावण महिन्याला निरोप दिला जात असे. मात्र, या परंपरा कोरोना संकटामुळे अडचणीत आल्या असून भजन, कीर्तन, हरिपाठ, करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे .
बॉक्स : --
येथील ह.भ.प. मधुकर महाराज बोदलकार यांना विचारणा केली असता गतवर्षीपासून कोरोना महामारी संकट सुरू झाले. त्यामुळे वारीची परंपरा खंडित झाली तसेच श्रावणात घरोघरी होत असलेले भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम साधेपणाने करण्याची वेळ आली आहे. यामुळे काही हौशी भजनकरी, कीर्तनकार यांना कोरोना महामारीमुळे हिरमोड झाला आहे. शासनाने धार्मिक कार्यक्रम घेणारे कीर्तनकार, प्रवचनकार, भजनकरी यांना त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी काही अटी शिथिल करून धार्मिक कार्यक्रम घेण्यास मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे .
बॉक्स : - भजन करणारे साहित्य धूळखात
गावा गावात हौशी भजन मंडळे आहेत या मंडळातील भजनकरी भजनात वापर करत असलेली ढोलकी, मंजिरी, हार्मोनियम, तबला, यासह अन्य साहित्याचा वापर होत नसल्याने ती साहित्य धूळखात पडलेली दिसून येत आहेत. भजनाचे साहित्य नादुरुस्त पडलेले आहेत.
200821\img_20190812_214659.jpg
भजनाचे जुने संग्रहीत फोटो