लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान व जिल्ह्यातील आश्रमशाळा तसेच शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवाव्या या प्रमुख मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाºयांनी जि. प. सदस्य अनिल केरामी यांच्या नेतृत्वात खा. अशोक नेते यांना घेराव घालून निवेदन सादर केले.कोरची आश्रमशाळेत शिकत असलेला विद्यार्थी सुशिल नैताम या विद्यार्थ्याचा १२ सप्टेंबर रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाला अजूनपर्यंत मदत मिळाली नाही. मदत मिळवून देण्यासाठी खा. अशोक नेते यांनी पाठपुरावा करावा, मागील तीन वर्षांपासून शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळा यांच्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या सर्व बाबीकडे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष घालावे, अन्यथा कोरची तालुक्यातील संपूर्ण वसतिगृह, शाळा, आश्रमशाळा बंद ठेवून आंदोलन करू, असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन स्वीकारतेवेळी आ. कृष्णा गजबे उपस्थित होते. आमदारांनीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आदिवासी विद्यार्थी संघाचा खासदारांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:36 AM
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान व जिल्ह्यातील आश्रमशाळा तसेच शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवाव्या या प्रमुख मागणीसाठी...
ठळक मुद्देनिवेदन सादर : आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरवा