लोकमत न्यूज नेटवर्कदेचलीपेठा : सिरोंचा तालुक्यातील देचलीपेठा परिसरातील पातागुडम येथे स्थानिक व परिसरातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्येविरोधात नक्षल्यांकडून हत्या झालेल्या इसमाचे स्मारक उभारून नक्षल्यांविरोधी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.सिरोंचा तालुक्यातील पातागुडम पोलीस मदत केंद्रांतर्गत पातागुडम येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये नक्षलवाद्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून येथील नागरिक संटी गोरगोंडा याची हत्या केली. ग्रामस्थांनी यावर्षी नक्षल्यांच्या वर्चस्वाला झुगारत गोरगोंडा यांचे स्मारक गावात उभारले आहे. आम्हाला शांतता हवी आहे, असे या स्मारक निर्मितीतून स्थानिक नागरिकांनी सिध्द केले आहे. सदर स्मारकाचे पूजन संटी गोरगोंडा यांच्या पत्नी व मुलांच्या हस्ते करण्यात आले.
नक्षल्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी उभारले स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:17 AM
लोकमत न्यूज नेटवर्कदेचलीपेठा : सिरोंचा तालुक्यातील देचलीपेठा परिसरातील पातागुडम येथे स्थानिक व परिसरातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्येविरोधात नक्षल्यांकडून हत्या झालेल्या इसमाचे स्मारक उभारून नक्षल्यांविरोधी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.सिरोंचा तालुक्यातील पातागुडम पोलीस मदत केंद्रांतर्गत पातागुडम येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये नक्षलवाद्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून येथील नागरिक संटी गोरगोंडा याची हत्या केली. ...
ठळक मुद्देदेचलीपेठा स्मारकाचे पूजन : गावकरी म्हणतात, हिंसा नको शांतता हवी