गडचिराेली : राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाचा २०१९-२० या वर्षाचा अहवाल नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामध्ये गडचिराेली जिल्ह्यात महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हायपर टेन्शनचे (उच्च रक्तदाब) प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
रक्तदाबामध्ये सिस्टाेलिक व डायस्टाेलिक हे दाेन गट पडतात. १२० एमएम सिस्टाेलिक रक्तदाब व ८० एमएम डायस्टाेलिक रक्तदाब हा आदर्श रक्तदाब मानल्या जाते. १२० ते १३९ व ८० ते ८९ एमएम दरम्यानचा रक्तदाब साैम्य रक्तदाब गटात माेडते. जिल्ह्यात १०.४ टक्के महिलांना व ११.१ टक्के पुरूषांना साैम्य रक्तदाब असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. १४० ते १५९ व ९० ते ९९ एमएम हा मध्यम स्वरूपाचा रक्तदाब मानल्या जाते. तर १६० एमएम पेक्षा जास्त सिस्टाेलिक व १०० एमएम पेक्षा जास्त डायस्टाेलिक असल्यास उच्च रक्तदाब मानल्या जाते. गडचिराेली जिल्ह्यात ३.१ टक्के महिला व ३.७ टक्के पुरूषांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. १७ टक्के महिला व १७.२ टक्के पुरूष विविध प्रकारची औषधे घेऊन उच्चरक्तदाब नियंत्रीत ठेवत असल्याचे सुध्दा दिसून आले आहे.
बाॅक्स
२०१५ च्या तुलनेत रूग्ण वाढले
२०१५-१६ मध्ये सुध्दा राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला. त्यामध्ये २०१९-२० च्या तुलनेत उच्च रक्तदाबग्रस्त नागरिकांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. २०१५-१६ मध्ये ५.८ टक्के महिला व ७.२ टक्के पुरूषांना साैम्य रक्तदाब, ०.८ टक्के महिला व २.२ टक्के पुरूषांना मध्यम स्वरूपाचा रक्तदाब तर ०.४ टक्के महिला व ०.६ टक्के पुरूषांना रक्तदाबाचा त्रास हाेता. २०१५-१६ व २०१९-२० या दाेन सर्वेक्षणांची तुलना केल्यास उच्चरक्तदाबग्रस्त नागरिकांची संख्या जवळपास दाेन ते तीन पटीने वाढली असल्याचे दिसून येते.
रक्तदाब वाढण्याचे कारण
मानसिक तनाव, व्यायाम व शारीरिक श्रमाचा अभाव, किडनीचे राेग, वाढते वयाेमान ही प्रामुख्याने रक्तदाबवाढीची प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते.
काेट
उच्चरक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी तनावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. नियमित व्यायाम करावा. उच्चरक्तदाब ग्रस्त व्यक्तीने मिठाचे कमी प्रमाणात सेवन करावे. वजन नियंत्रीत ठेवावे. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्यास नियमित औषधे घ्यावीत.
-डाॅ. मनिष मेश्राम, जिल्हा रूग्णालय