गडचिराेली : काेराेना संकटामुळे विविध कारणांनी ताण-तणाव व कलह वाढले आहेत. नाेकरीच्या ठिकाणीही असुरक्षितता जाणवत असल्याने नैराश्य, नकारात्मक भावना वाढीस लागून मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झालेला आहे. अशावेळी माणसा-माणसाचा एकमेकांशी याेग्य संवाद राहिल्यास मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.
काेराेना लाॅकडाऊनच्या काळात अनेकजण घरातच हाेते. त्यावेळी समाजाशी असलेला संवाद काहीसा लुप्त झाला हाेता. याचदरम्यान अनेकांचे राेजगारही हिरावले गेले. पती-पत्नी सतत घरातच असल्याने काही कुटुंबांत गृहकलही वाढीस लागले. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाल्याने मानसाेपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागत आहे.
बाॅक्स
मन हलके करणे हाच उपाय
मानसिक ताण-तणावाचे वेळीच नियाेजन न केल्यास त्याचा परिणाम प्रकृतीवर हाेताे. मानसिक ताण-तणावातून मुक्त हाेण्यासाठी मन हलके करणे गरजेचे आहे. यासाठी व्यायाम, याेग, प्राणायम करणे, राग व क्राेधाला शांत ठेवणे, भावना व्यक्त करणे, बाेलून मन हलके करणे, सकारात्मक विचार करणे आदी बाबी आवश्यक आहेत.
ताण-तणावाचे कारण
काेराेना संकटाच्या कालावधीत घराचे हप्ते, कर्ज, हाती पैसे नसणे आदी समस्या निर्माण झाल्या. अशावेळी कुटुंबाचे कसे हाेणार? जबाबदाऱ्या पूर्ण कशा करायच्या? असे विचार मनात घाेळत असल्याने मनावर ताण वाढत जाताे. अति विचार करणे, भीती वाटणे आदींमुळेही ताण-तणाव वाढत असताे.
काेट
मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. प्रचंड विचार करणे, भीती वाटणे, शांत बसावेसे वाटणे, अशी लक्षणे दिसताच मित्रांसाेबत गप्पा माराव्यात. आवडत्या विषयात मग्न व्हावे. जवळच्या व्यक्तीसाेबत मनमाेकळेपणे बाेलावे.
- डाॅ. मनीष मेश्राम, मानसिक राेगतज्ज्ञ