शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पारा प्रचंड वाढला, आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:52 AM

गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, .....

ठळक मुद्देजनजीवन काही प्रमाणात प्रभावित : निरोगी आरोग्यासाठी विशेष काळजी घेण्याचा आरोग्य प्रशासनाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, तसेच पारा वर चढत असल्याने सध्यातरी घराबाहेर निघताना आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, अशा सल्ला आरोग्य प्रशासन व तज्ज्ञांकडून दिला जात आहे. एप्रिल महिन्यात सुरुवातीला काही दिवस उष्णतामानाचा पारा वर चढला होता. परंतु त्यानंतर झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे काही काळाकरिता वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा सूर्याने आपले रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐरवी नेहमी गर्दी राहणारे अनेक रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य दिसून येतात. तसेच भर उन्हात घराबाहेर पडणारे अनेक लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी फायदेशिर ठरणारे लिंबूसरबत, मठ्ठा, उसाचा रस, लस्सी सेवन करताना दिसून येत आहेत. एकूणच वाढत्या उन्हामुळे जनजीवन काही प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.दुपारी घराबाहेर निघू नकावाढत्या उन्हामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळले पाहिजे. विशेष करून लहान मुलांना प्रवासासाठी उन्हात नेऊ नये. सकाळी तसेच सायंकाळच्या सुमारास प्रवास करावा. जेणे करून उन्हापासून बचाव होईल.पुरेसे पाणी प्यावेभर उन्हात घराबाहेर पडणाऱ्यांसह इतरांनीही उन्हाळ्याच्या दिवसात जास्त घाम येत असल्याने तहाण लागली नाही तरी पुरेसे पाणी पिले पाहिजे. दिवसभर गेलेल्या घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे वाढत्या उष्णतामानात पुरेसे पाणी पिणे फायदेशिर ठरते.पाणपोईची संख्या अल्पजीवाची काहीली करणाºया प्रत्येक वाटसरूला उन्हापासून दिलासा मिळून पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत काही संघटनांतर्फे पाणपोई विविध ठिकाणी लावल्या जाते. मात्र यंदा पाणपोईची संख्या जिल्ह्यात अल्प दिसून येत आहे.जनावरांना सावलीत ठेवाउन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी पिण्याकरिता द्यावे, अशक्त व कमजोरीसारखे जाणवत असल्यास तत्काळ पशु वैदयकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे.अशाप्रकारे घर थंड ठेवावेउन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करताना नागरिकांनी पिण्याचे पाणी सोबत घ्यावे, तसेच आपले घर कसे थंड ठेवता येईल, यासाठीही प्रयत्न करावे.घराला पडदे, झडपा, सनशेड बसवावे, रात्रीच्या सुमारास खिडक्या उघड्या ठेवाव्यात, उन्हाचा तडाखा जाणवल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी. शिवाय फॅन व कुलरचा वापर करावा. अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावा.सौम्य रंगाचे सुती कपडे परिधान करावेउन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी सौम्य रंगाचे तसेच सैल व कॉटनचे कपडे परिधान केले पाहिजे. घराबाहेर पडताना बाहेर गॉगल, छत्री, टोपी, बुट तसेच चप्पल वापरावे. पांढरा दुपट्टा डोक्याला बांधणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांचा वाढत्या उन्हापासून बचाव होत असतो.अनेक नागरिकांना ऋतुमानानुसार कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसात सौम्य रंगाचे सैल व सुती कपडे वापरणे फायदेशिर ठरते. लहान मुला-मुलींनाही उन्हाळ्यात कपडे घालून देताना काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Temperatureतापमान