कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता पिपरे हाेत्या. यावेळी नगरसेवक सतीश विधाते, अनिल पोहनकर, जिल्हा केंद्र प्रतिनिधी प्रा. विजय दिघडे उपस्थित होते. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रा. विजय दिघडे यांनी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान इयत्ता १० वीतील गुणवंत विद्यार्थिनी नंदिनी पराग दडवे, व्टिंकल दिलीप दडवे, साहील प्रशांत नागुलवार, विधी राजेश वाणी, सोहम शैलेश वाणी, आदित्य दामोदर नैताम, राधा अतुल खडसे, लखन उमेश काबरा, अनिरुद्ध फकिरा गड्डमवार तसेच इयत्ता १२ वी तील ओम विवेक बच्चुवार, सोहम शरद देविकर, वृषभ सुनील दिवसे आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संदीप लांजेवार, तर आभार तेजराव बोरकर यांनी मानले. यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर मेश्राम, टिकेंद्र कुकडकर, विवेक बच्चुवार, नरेश मडावी, सुभाष धंदरे, प्रवीण बंचपल्लीवार, सुनील दिवसे, शुभांगी दिघडे, स्मिता नैताम, नलिनी बच्चुवार, वैष्णवी मडावी यांनी सहकार्य केले.
श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:39 AM