गडचिराेली : गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय व विविध वस्तू खरेदी करण्याकरिता ऑनलाईन कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाेकांची फसवणूक केली जात आहे. विशिष्ट ॲप डाऊनलाेड करायला सांगून संबंधित व्यक्तीची बॅंकिंगची माहिती ऑनलाईन गाेळा केली जाते. त्यानंतर संपूर्ण पैसे गहाळ केले जातात, असे प्रकार वाढले असून कमी टक्क्यात कर्जाचा मॅसेज आला तर काेणत्याही प्रकारचे ॲप डाऊनलाेड करू नये.
विविध क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा उपयाेग केला जात आहे. यापासून गुन्हेगारीचेही क्षेत्र सुटले नाही. ऑनलाईन फसवणूक करणारे विविध प्रकारच्या ॲपचा वापर करून लाेकांची फसवणूक करतात. यासाठी व्हाॅट्सॲप व माेबाईलवर संपर्क साधून विशिष्ट वस्तू व लाॅटरी अथवा आपल्याला कर्ज मंजूर झाले आहे, असे सांगून सुरुवातीला काही रक्कम भरण्यास सांगतात. सदर रक्कम भरल्यानंतर संपूर्ण रक्कम खात्यात जमा केली जाईल, असे सांगतात.
बाॅक्स ......
ॲप डाऊनलाेड करताच बँक खाते साफ
-एखादा अनाेळखी व्यक्ती कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी फाेन केला असल्यास त्याच्या फाेनला प्रतिसाद न देता सांगितलेले ॲपसुद्धा डाऊनलाेड करू नये.
-प्ले स्टाेअरवर अनेक बनावट ॲप असतात. त्यामुळे ओरिजनल ॲप काेणते याबाबत खात्री करावी तेव्हाच संबंधित ॲप डाऊनलाेड करावे. भूलथापांना बळी पडू नये.
-कर्ज घ्यायचे असल्यास संबंधित बॅंक व फायनान्स कंपनीशी संबंधित अधिकृत ॲप वापरावे. तेव्हाच फसवणूक हाेणार नाही.
बाॅक्स ....
यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकता
केस १ : गडचिराेली शहराच्या एका व्यक्तीला अज्ञाताने फाेनवर संपर्क साधून तुम्हाला १५ टक्के ऑफरमध्ये लाॅटरीद्वारे फ्लॅट लागले आहे. यासाठी तुम्हाला ५ टक्के रक्कम ऑनलाईन ॲप डाऊनलाेड करून भरावे लागेल. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया केली जाईल. तसेच ५ टक्के भरलेली रक्कमसुद्धा एकूण रकमेत समाविष्ट केली जाईल, असे सांगितले. सदर व्यक्तीने ही प्रक्रिया पार पाडली. यात त्याला १८ हजारांचा भुर्दंड बसला.
बाॅक्स .....
केस २ : अडपल्ली येथील एका व्यक्तीला फेसबुकवर व्हाॅईस काॅल येत हाेते. तुम्हाला २० लाखांची लाॅटरी लागली आहे. यासाठी तुम्हाला पाठविलेल्या नंबरवर संपर्क साधा. त्यानंतर काही रक्कम भरून लाॅटरीची रक्कम ताब्यात घ्या, असे सांगितले जात हाेते. परंतु सदर व्यक्तीने मात्र सतर्क राहून अशा प्रकारच्या काॅलला प्रतिसाद दिला नाही. याशिवाय माेबाईलवर विशिष्ट मॅसेज पाठवून लिंक उघडण्यासह सांगितले जाते.
बाॅक्स ....
या आमिषांपासून सावधान
n गृह अथवा वाहन कर्ज याेजना केवळ आठ दिवसांच्या कालावधीसाठी आहे. याचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचे आमिष दिले जाते.
n फायनान्स कंपनीची ऑफर असून या ऑफरमध्ये भरघाेस सूट दिली जात आहे. ऑफरमध्ये जवळपास निम्मी बचत हाेईल, असे सांगून फसवणूक केली जाते.
बाॅक्स ....
अशी घ्या काळजी
n आमिष दाखविणारे काेणत्याही प्रकारचे ॲप डाऊनलाेड करू नये.
n ही याेजना काही काळापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे लिंकचा वापर करून बॅंकेची डिटेल भरावी असे सांगणाऱ्या मेसेजपासून सावधान राहावे.
n साेशल मीडियाचा वापर करताना अनाेळखी व्यक्तींसाेबत व्यक्तिगत बाबी शेअर करू नये. तसेच ऑनलाईन वस्तूंवर भरघाेस सूट अशा गाेष्टींवर विश्वास ठेवू नये.