शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

जिल्हाभरात महावितरणमार्फत मीटर तपासणी माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 5:00 AM

वीज बिल भरण्याच्या घरबसल्या सुविधा उपलब्ध असतानाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिन्यांत वीज बिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. वीजग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल वेळेवर स्वतःहून भरणे अपेक्षित आहे. तरीही महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना थकबाकी वसुलीकरिता ग्राहकांच्या दारापर्यंत जावे लागत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच संशयास्पद वीजवापर ज्यात १ ते ३० युनिट वीजवापर व शून्य वीजवापर असणारे ग्राहक तसेच वीजवापराच्या प्रमाणात वीज बिल न येणाऱ्या ग्राहकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या ४० दिवसांत  १९ हजार २१२ ग्राहकांचा वीजपुरवठा  २७ कोटी ६५ लाखांच्या थकबाकीसाठी खंडित करण्यात आला. १८० वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.   वीज बिल भरण्याच्या घरबसल्या सुविधा उपलब्ध असतानाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिन्यांत वीज बिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. वीजग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल वेळेवर स्वतःहून भरणे अपेक्षित आहे. तरीही महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना थकबाकी वसुलीकरिता ग्राहकांच्या दारापर्यंत जावे लागत आहे. ही मोहीम पुढे अशीच धडकपणे राबविण्यात येणार असून, महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी महावितरणच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरले आहेत.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, इतर लघुदाब, पाणीपुरवठा योजना, कृषिपंपधारक व पथदिवे या ग्राहकांकडे ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण थकबाकी ४२१ कोटी  झाली आहे. ती मागील वर्षाची ९९ कोटी ३३ लाख येणे आहेच. कृषिपंपधारकांसाठी नवीन कृषी ऊर्जा धोरणामधून थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणद्वारा करण्यात येत आहे. थकबाकीसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक,  सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहक अशा एकूण १९ हजार २१२  वीज ग्राहकांचा वीजपुरवठा ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ कालावधीत (आतापर्यंत) खंडित करण्यात आला. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित  झाल्यावर वीजनियामक आयोगाच्या निर्देषानुसार नियमाप्रमाणे पुनर्जोडणी शुल्क आकारण्यात येत आहे.

९३० मीटर संथगतीने फिरताना आढळले

आतापर्यंत १ ते ३० युनिट वीजवापर असलेल्या ५८ हजार ८५५ ग्राहकांचा वीजवापर तपासण्यात आला आहे. त्यात ९३० वीजग्राहकांचे वीजमीटर संथगतीने फिरताना आढळले. शून्य वापर असलेल्या ९ हजार १३३ ग्राहकांपैकी ५ हजार ८३१ ग्राहकांचा वीजवापर व वीजमीटर तपासण्यात आले. त्यात १३९ वीजमीटर संथ, तर १४० मीटर बंद आढळले. या विशेष मोहिमेत १८० ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले.

थकबाकीदारांना वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपूरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल ॲप, गुगल पे, पेटीएम यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियमित ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत आहे. वीजग्राहकांनी  वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे.  - सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, महावितरण

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज