एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील मेंढरी जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.नक्षल्यांकडून २३ ते २९ मार्च दरम्यान ह्यबंदी छोडो सप्ताहह्ण पाळला जात आहे. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान तीव्र केले आहे. मेंढरी जंगल परिसरात नक्षल शोधमोहीम सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या नक्षल्यांनी सी-६० पोलीस पथकावर हल्ला केला. दरम्यान झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून जंगल परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे. मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.घटनास्थळ परिसरात शोधमोहीम राबविली असता, घटनास्थळावर एक रायफल, बॉम्ब बनविण्याचे साहित्य व नक्षल्यांच्या वापराचे दैनंदिन साहित्य आढळून आले.
चकमकीत महिला नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 9:49 PM