गडचिराेली : जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात दूध आणि साखरेचे भाव कायमच आहेत. सद्यस्थितीत ३८ ते ४० रुपये किलाे दराने साखर विकली जात आहे. तर दूध ४० रुपयांपासून ६० रुपये लिटर विकल्या जात आहे. दूध व साखरेपासून मिठाई तयार केली जाते. सणादरम्यान व गणेशाेत्सवाच्या कालावधीत पेढा, मिठाईची मागणी वाढली असली तरी गडचिराेली शहरात व जिल्ह्यात दूध, साखरेप्रमाणेच पेढा व मिठाईचे भाव स्थिर आहेत.
गणेशाेत्सव, ज्येष्ठागाैरी व नवरात्र उत्सवात माेठ्या प्रमाणावर गाेड खाद्यपदार्थ व मिठाईला मागणी असते. दरवर्षी मिठाईची पाच ते दहा टक्क्यांनी वाढ केली जाते. कच्च्या मालाचे भाव वाढल्याच्या कारणावरून ही दरवाढ करण्यात येत असल्याचे दुकानदारांकडून सांगितले जात आहे. गडचिराेली शहरातील स्वीट मार्ट दुकानात पेढा व मिठाईचे भाव गेल्या वर्षभरापासून स्थिर आहेत.
बाॅक्स .....
बंगाली मिठाईचा
दर ३२० रुपये किलाे
गडचिराेली जिल्ह्यात बंगाली मिठाईला माेठी मागणी आहे. शहरातील स्वीट मार्ट दुकानात ३२० रुपये किलाे दराने विकली जात आहे.
बाॅक्स ....
दरांवर नियंत्रण काेणाचे?
पेढा व मिठाईचे दर दुकानदार स्वत:च ठरवितात. इतर काेणीही मिठाईचा दर ठरवीत नाही. हे दर कमी-जास्त हाेतात. खाद्यतेल व इतर पदार्थांची भाववाढ झाल्यानंतर त्यापासून तयार हाेणाऱ्या विविध वस्तूंचेही दर वाढत असतात. केंद्र शासनातर्फे खाद्यतेलाच्या भावात वाढ केल्यानंतर त्यापासून तयार हाेणारे पदार्थही महाग हाेतात.
बाॅक्स ...
दुकानदारांचा नाइलाज
गॅस, खाद्यतेल व इंधन दरवाढीमुळे लागणाऱ्या कच्च्या मालात वाढ झालेली आहे. दाेन वर्षांपूर्वीच्या दराने मिठाई व पेढ्याची विक्री करणे शक्य हाेत नाही. भाववाढ करावी असे आम्हाला वाटत नाही. परंतु खाद्यतेल व गॅसचे भाव भडकल्याने प्रसंगी पेढा, मिठाईच्या दरात वाढ करावी लागते. आमचा नाइलाज असताे, असे दुकानदारांनी सांगितले.
काेट ....
का वाढले दर?
मागणी अधिक व पुरवठा कमी असला की काेणत्याही वस्तूचे दर वाढतात. हे सर्वश्रुत आहे. सणासुदीच्या काळात पेढा, मिठाईची मागणी वाढत असते. मात्र गडचिराेली शहरातील नागरिकांची मानसिकता व परिस्थिती लक्षात घेतली जाते. गेल्या वर्षभरापासून मिठाईचा भाव वाढलेला नाही. जुनेच दर कायम आहेत.
-मदतनसिंह राजपुराेहित, स्वीट मार्ट मालक
गणेशाेत्सवात मिठाईला पाहिजे तशी मागणी नाही. दिवाळी सणादरम्यान मिठाई व पेढ्याला प्रचंड मागणी असते. दूध, साखरे साेबतच मिठाई तयार करण्यासाठी विविध वस्तूंची गरज असते. शिवाय बरीच मेहनत आहे. त्यामुळे मिठाईचे दर दूध व साखरेपेक्षा ज्यादा असतात. कारागिरांना माेबदला द्यावा लागताे.
- जेटूसिंह राजपुराेहित, स्वीट मार्ट मालक
काेट.......
ग्राहक म्हणतात...
दूध, साखर तसेच इतर खाद्यपदार्थांचे भाव थाेडेफार वाढले आहेत. अशा स्थितीतही शहरात पेढा व मिठाईचे भाव कायम आहेत. सणादरम्यान भाववाढ केली जाते हे चुकीचे आहे. या भाववाढीवर नियंत्रण काेणाचे, असा प्रश्न ग्राहकांना पडत असताे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
- पांडुरंग बावणे, ग्राहक
सणादरम्यान मिठाई व पेढ्याला ग्राहकांकडून माेठी मागणी हाेत असते. ही संधी साधून दुकानदार भाववाढ करीत असतात. विशेष करून दिवाळी सणादरम्यान मिठाई व इतर गाेड पदार्थांचे भाव वधारत असतात. वस्तूंच्या किमतीवर शासन प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक आहे.
- वासुदेव करंगामी, ग्राहक
बाॅक्स ....
गडचिराेली शहरातील मिठाईचे दर (प्रतिकिलाे)
मिठाई -३६०
पेढा -३६०
बर्फी - ४००
जिलेबी - १२०
काजू कतली - ८००