शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

बोगस रॉयल्टीच्या भरवशावर गौण खनिजाचा व्यवसाय जोरात

By admin | Published: November 12, 2014 10:44 PM

अवैध गौण खनिज उत्खननाबाबत राज्य सरकार विविध निर्णय घेऊन प्रतिबंध घालण्याचे काम करीत असताना देसाईगंज शहरात मात्र बोगस रॉयल्टीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे.

देसाईगंज : अवैध गौण खनिज उत्खननाबाबत राज्य सरकार विविध निर्णय घेऊन प्रतिबंध घालण्याचे काम करीत असताना देसाईगंज शहरात मात्र बोगस रॉयल्टीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. गौण खनिज साठवणुकीचा परवानाप्राप्त इसमाच्या नावाने बोगस रॉयल्टी बनवून गौण खनिजाची तस्करी सुरू असल्याचे प्रकरण शहरातील नितीन डेंगानी यांनी उजेडात आणले आहे. याप्रकरणी त्यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कारवाई केली नसल्याची माहिती पुढे आली आहे.शहरातील नितीन डेंगानी यांनी गौण खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथून रेती वाहतुकीचा परवाना प्राप्त केला. या परवानान्यानुसार त्यांना रॉयल्टी क्र. ४११८४५१ ते ४११८६०० पर्यंतचे तीन बुक व ४३७९९५१ क्रमांकाचे एक बुक असे ट्रॅक्टर वाहतुकीचे तीन व एक ट्रक वाहतुकीचे एक बुक प्रशासनाकडून प्राप्त झाले. यानुसार डेंगानी यांनी रेतीची वाहतूक सुरू होती. रेतीची तस्करी करीत असताना डेंगानी यांनी ट्रक एमएच-४०-वाय-९५१२ नुसार आरबीडब्ल्यू नागपूर यांच्या नावाने ट्रक पकडला. त्याच्याकडे नितीन डेंगानी यांच्या नावाचा पावती क्रमांक ४४८५१३ हा बोगस क्रमांक असलेली पावती सापडली. त्यांनी ती पावती हिसकावून घेतली व डेंगानी यांनी देसाईगंज पोलिसात तक्रार दाखल केली. अशा अनेक बोगस रॉयल्टी पावत्यांच्या भरवशावर रेतीची सर्रास वाहतूक सुरू आहे. गौण खनिजाच्या उत्खननावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. बांधकाम थांबू नये, याकरिता काही नियमता शिथीलता आणून परवानगी देण्यात येत आहे. मात्र तस्करांनी बोगस रॉयल्टीचा वापर करून गौण खनिज उत्खननाचा गोरसधंदा सुरू केला आहे. त्यामुळे देसाईगंज तालुक्यात पोलिसांना आता यादृष्टीने तपास करावा लागणार आहे. यापूर्वीही आरमोरी येथे अशाच प्रकारचे एक प्रकरण उजेडात आले होते. (वार्ताहर)