लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : स्थानिक पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी येथील जि.प. हायस्कूलमध्ये आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली व आ. कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत विविध मुद्यांवर चांगलीच गाजली.सभेला पं.स. सभापती अजमन राऊत, उपसभापती अनुसया कोरेटी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, श्रीनिवास दुल्लमवार, जि.प. सदस्य लता पुंगाटे, जि.प. सदस्य राजू जिवानी, संवर्ग विकास अधिकारी भांड, नायब तहसीलदार भगत, शशिकांत साळवे, साईनाथ साळवे उपस्थित होते. सभेमध्ये महसूल, कृषी, आरोग्य, सिंचन, विद्युत, शिक्षण, महिला व बालविकास, पंचायत व जलसंधारण आदी विभागांच्या विविध कामांवर व मुद्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. त्यामध्ये रोहयो अंतर्गत हेटी येथील सिमेंट रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगाव येथील निकृष्ट दर्जाचे काम, प्रसुतीगृहाची दुरूस्ती न करता बिलाची उचल, पुसावंडी जवळील लाल गिट्टी कॉंक्रीटीकरण, आमदार फंडातील पन्नेमारा नजिकच्या किटाळी येथे लाल गिट्टीच्या कॉंक्रीटचा वापराबाबत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचा ठराव घेण्यात आला. खांबाळा येथील रोजगार सेवक, राजोली येथील पुलाचे बांधकाम, कुशल कामाचे एक वषार्पासून थकीत देयक, गट्टा येथील शौचालय बांधकाम, घरकूल, सिंचनाचे प्रश्न आदींबाबत चर्चा करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी सभेत करण्यात आली. याप्रसंगी आ. गजबे यांनी मुरूमगाव क्षेत्रातील समस्यांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी वामन सावसाकडे, आभार विस्तार अधिकारी जुवारे यांनी मानले.
विविध मुद्यांवर गाजली आमसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:17 AM
स्थानिक पंचायत समितीची वार्षिक आमसभा शुक्रवारी येथील जि.प. हायस्कूलमध्ये आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली व आ. कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत विविध मुद्यांवर चांगलीच गाजली.
ठळक मुद्देदोन्ही आमदारांनी दिले आश्वासन : निकृष्ट कामाच्या चौकशीचा ठराव पारित