शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : स्वतंत्र आस्थापना द्यावीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मोहली (धानोरा) येथे इंग्रजी माध्यमांच्या मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात आली आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रासाठी या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी केले आहे. मात्र या शाळांवर बहुतांश जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्हा निर्माण झाले आहे.जिल्हा परिषद व मॉडेल स्कूलचा शैक्षणिक दर्जा एकच शिक्षक कसे काय उंचावतील, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे. मॉडेल स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जि. प. चे प्राथमिक शिक्षक प्रतिनियुक्तीवर अध्यापन करीत आहेत. त्यामुळे ज्या शाळांमधून हे शिक्षक प्रतिनियुक्तीवर आहेत, त्या मूळ जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. त्यामुळे अशा शिक्षकांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ शाळेत परत पाठवावे, तसेच मॉडेल स्कूलमध्ये नव्याने माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. स्कूलमध्ये सुविधांचा अभाव-चलाखगडचिरोली जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या अनेक मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी वस्तीगृहाची सुविधा नाही. पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध नाही. याशिवाय प्रयोगशाळेचा अभाव आहे. सदर मॉडेल स्कूलमध्ये सर्व सोयीसुविधा कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना धोका होणार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते एम. डी. चलाख यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मॉडेल स्कूलचे नजीकच्या हायस्कूलला समायोजन करावे, जेणेकरून तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही, अशी मागणी चलाख यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांवरच मॉडेल स्कूलची धुरा
By admin | Published: June 13, 2017 12:44 AM