आॅनलाईन लोकमतकुरखेडा/आरमोरी : कुरखेडा तालुक्यातील हेटीनगर व आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे संघटनेच्या महिलांनी गावातील मोहफूल दारू व सडवा पकडून नष्ट केला. तसेच दारूची विक्री न करण्याबाबत विक्रेत्यांना तंबी दिली.पाथरगोटा येथे गाव संघटनेने दारू बंद केलेली असतानाही एका दारू विक्रेत्याकडे दहा बॉटल दारू सापडली. महिलांनी याची माहिती पोलिसांना देऊन दारू विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.हेटीनगर येथे महिलांना एका विक्रेत्याकडे ५ लिटर दारू, ४० किलो मोहफुलाचा सडवा व दुसºया एका विक्रेत्याकडे अंदाजे ५० किलो मोहफुलाचा सडवा आढळून आला. महिलांनी धाड टाकल्यानंतर दारूविक्रेत्यांनी पळ काढला. सापडलेली दारू व सडवा महिलांनी नष्ट केला.हेटीनगर येथील महिलांनी यापुढे दर आठ दिवसांनी गावात मोहीम राबवून तपासणी करू आणि त्यात जर गावात दारू आढळली, तर ती पुन्हा नष्ट करू अशी तंबीच दारू विक्रेत्यांना दिली आहे.भामरागड येथील पिडीमिली या गावातील विद्यार्थी व शिक्षकांनी रॅली काढून गावातील खर्रा पन्न्यांची होळी केली. धानोरा तालुक्यातील खांबाळा, मुलचेरा येथील रेंगेवाही या गावांमध्येही ‘यंदाची होळी, दारूमुक्त होळी’च्या घोषणांच्या गजरात रॅली निघाली व चौकात खर्रा पन्न्यांची होळी पेटवण्यात आली. यात महिलांसोबतच मुले व युवकांनीही पुढाकार घेत गावाला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेतला. महिलांच्या वतीने गाव व्यसनमुक्त करण्याकरिता पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे अवैैध दारूविक्रेत्यांच्याही रोषाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांचे महिलांना नेहमी सहकार्य लाभणे गरजेचे आहे.
मोहा सडवा व दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:14 AM
कुरखेडा तालुक्यातील हेटीनगर व आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे संघटनेच्या महिलांनी गावातील मोहफूल दारू व सडवा पकडून नष्ट केला. तसेच दारूची विक्री न करण्याबाबत विक्रेत्यांना तंबी दिली.
ठळक मुद्देमहिलांच्या संघटनेचा पुढाकार : हेटीनगर व पाथरगोटा येथे धाड