शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

मोहसडवा व दारू केली नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 5:00 AM

मुक्तिपथ अभियान व गावसंघटनेच्या अथक परिश्रमातून मुरूमगावाला दारूमुक्त गावाची एक ओळख मिळाली. या गावातील महिलांचा दारूविक्रेत्यांवर नियंत्रण असल्यामुळे दारूबंदी कायम टिकून होती. मात्र, माहिनाभरापासून शेतीचे कामे सुरू असल्यामुळे गावसंघटनेच्या महिला व्यस्त होत्या. या संधीचे सोने करीत गाव परिसरातील अवैध दारू विक्रेत्यानी डोके वर काढत घरात व शेतशिवारात दारूचे अड्डे निर्माण केले.

ठळक मुद्देमुरूमगावात धाड : पोळ्याच्या दिवशी दारूविक्रेत्यांविरोधात महिलांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील दारूबंदी असलेल्या मुरूमगाव येथे पोळा सणाचे औचित्य साधून परिसरातील दारू विक्रेत्यांनी डोके वर काढीत दारूचे अड्डे निर्माण केले. याची माहिती गावसंघटनेच्या महिलांना लागताच शेत शिवार व घरांची झडती घेतली. यावेळी दारू अड्यांवरून मोठ्या प्रमाणात मोहसडवा व दारू जप्त करून नष्ट करण्यात आली.मुक्तिपथ अभियान व गावसंघटनेच्या अथक परिश्रमातून मुरूमगावाला दारूमुक्त गावाची एक ओळख मिळाली. या गावातील महिलांचा दारूविक्रेत्यांवर नियंत्रण असल्यामुळे दारूबंदी कायम टिकून होती. मात्र, माहिनाभरापासून शेतीचे कामे सुरू असल्यामुळे गावसंघटनेच्या महिला व्यस्त होत्या. या संधीचे सोने करीत गाव परिसरातील अवैध दारू विक्रेत्यानी डोके वर काढत घरात व शेतशिवारात दारूचे अड्डे निर्माण केले. पोळ्याला मद्यपींचे जत्थे दाखल होऊन प्रचंड पैसे कमविण्याचे स्वप्न दारू विक्रेते बघत होते. याची माहिती गाव संघटनाच्या महिलांना लागताच मुक्तीपथ तालुका चमू व महिलांची बैठक पार पडली. पोळ्याच्या दिवशीच अहिंसक कृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.त्यानुसार गावातील महिलांनी शेतशिवारातील दारूविक्रीच्या ६ अड्यांवर व १५ घरांवर धाड टाकून चौकशी केली. दरम्यान शेतशिवारातील तीन व सात घरातून मोठ्या प्रमाणात मोहसडवा व दारू जप्त करून नष्ट करण्यात आला. या अहिंसक कृतीमुळे गावातील व परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा गावात दारूविक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करू, असा इशारा देखील अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला आहे. यावेळी मुक्तीपथचे तालुका प्रेरक भाष्कर कड्यामी उपस्थित होते. पोळ्याच्या सणाला ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीला उधाण येत असते. हे ओळखून मुरूमगाव परिसरातील महिला सतर्क झाल्या आहेत.सिरोंचात दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखलसिरोंचा पोलिसांनी शहरातील चार अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून चौकशी केली. दरम्यान एका दारू विक्रेत्यांकडून तीन लीटर गुळाची दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावसंघटनेच्या पुढाकारातून शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. शहरातील संघटना दारुमुक्त शहर करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. काही दारूविक्रेत्यांनी अवैध व्यवसाय बंद केला आहे. मात्र, शहरातील काही दारूविक्रेते न जुमानता दारूविक्री करीत शहरातील सामाजिक वातावरण दूषित करीत आहेत. याचा अधिक त्रास महिलाना सोसावा लागत होता. पोलिसांनी शहरातील वार्ड क्रमांक ६ मधील चार अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून तपासणी केली. यावेळी एका अवैध दारूविक्रेत्याच्या घरातून दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सिरोंचा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार मारा मडावी, गेडाम, वांदेकर व त्यांच्या सहकार्यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.

टॅग्स :liquor banदारूबंदी