शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

सोमवार ठरला अपघातवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:16 PM

सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका, आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावर व घोटजवळील चापलवाडा-मक्केपल्ली मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देपेंटिपाका, चौडमपल्ली व चापलवाडातील घटना : तीन अपघातात दोन ठार, तीन जखमी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका, आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावर व घोटजवळील चापलवाडा-मक्केपल्ली मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार तर तिघे जखमी झाले आहेत.सिरोंचा - दुचाकी व जीपच्या अपघातात एक ठार व दोघे जखमी झाल्याची घटना सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील पेंटिपाका येथे सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली. आनंदम राजाराम राऊला (४०) रा. रोय्यलपल्ली जि. मंचरियाल (तेलंगणा) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर या अपघातात राजू आनंदम राऊला (१८) रा. रोय्यलपल्ली व नवीन मल्लय्या दुर्गम (१८) रा. टेकडा ता. सिरोंचा हे दोघेजण जखमी झाले आहेत.जखमींना सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आनंदम राऊला याचा मृत्यू झाला. उर्वरित जखमी राजू राहुला व नवीन दुर्गम या दोघांवर उपचार सुरू आहे. तेलंगणा राज्यातील रोय्यलपल्ली येथील आनंदम राऊला हा त्यांचा मुलगा राजू राऊला यांच्यासोबत सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला येथे रविवारी सायंकाळी आले. रात्री टेकडा येथील नातेवाईकांच्या घरी मुक्काम केला. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंकिसाजवळच्या नडिकुडा येथील अन्य नातेवाईकाच्या भेटीसाठी निघाले. पेंटिपाकाजवळ पोहोचताच आसरअल्लीवरून विरूद्ध दिशेने सिरोंचाकडे येणाºया जिपला दुचाकीची धडक बसली. आनंदमच्या कपाळाला जोरदार मार बसला. तिनही जखमींना तत्काळ रुग्णालयात आणण्यात आले पण एकाचा मृत्यू झाला. सदर अपघातातील जीप व दुचाकी या दोन्ही वाहनांचा क्रमांक कळू शकला नाही.कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीरआष्टी : दुचाकीला कारने धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली नाल्यावर सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. राहुल कुमरे (२०) व सुनील आत्राम (२२) असे जखमी दुचाकीस्वारांची नावे आहेत. राहुल व सुनील हे चंदनखेडीवरून दुचाकीवरून लगामला जात होते. चौडमपल्ली नाल्यावर दुचाकी व कार यांची जबर धडक झाली. या धडकेत दुचाकीचा समोरच्या चक्क्याचा भाग दुचाकीपासून वेगळा झाला तर कारचा उजव्या बाजूचा हेडलाईट फुटून चाकालाही मार लागला. या धडकेमुळे राहुल व सुनील या दोघांच्याही डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी पोलीस उपनिरीक्षक सपना चौधरी व पोलीस पथकाला पाठविले. दोघांनाही आष्टी ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता, दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉ. वलके यांनी दिली. कार चालक नामदेव मडावी रा. विहिरगाव ता. गडचिरोली हा आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठारघोट : चापलवाडा ते मक्केपल्ली मार्गावर दुपारी ३ वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विठ्ठल गंगा मक्केलवार (८०) रा. चापलवाडा याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विठ्ठल मक्केलवार हा दुपारी २ वाजता बकºयांना चारा आणण्यासाठी घरून निघाला. दरम्यान चापलवाडावरून येणाºया वाहनाने विठ्ठल मक्केलवार यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.