लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील अहेरी-गडअहेरी मार्गावरील गडअहेरी या कमी उंचीच्या पुलाची समस्या अद्यापही कायम आहे. सदर पुलावर पावसाळ्यात पाणी चढून यंदाही या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती असते. अहेरी तालुका मुख्यालयाशी गडअहेरी व इतर गावांचा संपर्क तुटतो. परिणामी नागरिकांना आरोग्य, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागते. कमी उंचीच्या पुलाची उंची वाढविण्यात यावी अथवा सदर ठिकाणी नव्याने उंच व मजबूत पूल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे केली. मात्र या मागणीकडे शासन व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष झाले आहे.गडअहेरी येथे उंच पूल बांधण्यात यावा, पर्लकोटा नदीवर पुलाच्या निर्मितीस मंजुरी द्यावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, प्रा. नागेसेन मेश्राम, रवी भांदककर, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी आदींच्या स्वाक्षºया आहेत. सदर समितीच्या वतीने यापूर्वीही जिल्हा निर्मितीसाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला आहे.
पावसाळ्यात वाहतूक ठप्प होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:48 PM
तालुक्यातील अहेरी-गडअहेरी मार्गावरील गडअहेरी या कमी उंचीच्या पुलाची समस्या अद्यापही कायम आहे. सदर पुलावर पावसाळ्यात पाणी चढून यंदाही या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देगडअहेरी पुलाची समस्या कायम : यंदाही अनेक गावांचा संपर्क तुटणार