लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले.बाजीराव मडावी हे वडिलोपार्जीत शेती करून सर्वसाधारण जीवन जगत होते. तरीसुद्धा नक्षलवाद्यांनी मडावी यांची हत्या पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून केली. या घटनेचा निषेध म्हणून नागरिकांनी स्मारक बांधले. त्यानंतर बाजीराव मडावी अमर रहे, नक्षलवाद मुर्दाबाद अशा नक्षलविरोधी घोषणा दिल्या. नक्षलवाद्यांना गावात येणे विरोध केला जाईल, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. दरम्यान बाजीराव मडावी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मेडपल्लीवासीयांचे सहकार्य लाभले.
नक्षल्यांकडून हत्या झालेल्याचे गावकऱ्यांनी बांधले स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:37 AM
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील रहिवासी बाजीराव मडावी यांची नक्षल्यांनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून २०१० मध्ये हत्या केली. या घटनेचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ ३ आॅगस्ट रोजी स्मारक उभारले.
ठळक मुद्देमेडपल्ली येथे पुढाकार : नक्षलविरोधी दिल्या घोषणा