शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

देसाईगंजच्या निर्मात्याचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:37 AM

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास ...

वडसा गावाचा कुठलाच उल्लेख सन १९००च्या आधीच्या भोसलेकालीन किंवा ब्रिटिशकालीन कागदपत्रात मिळत नाही. रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यानंतर या शहरास जरी ‘वडसा’ असे म्हटले जात असले तरी ते केवळ रेल्वेस्थानकाचे नाव आहे. शहर आणि नगरपरिषदेचे अधिकृत नाव मात्र ‘देसाईगंज’ असे आहे. मूळचे वडसा गाव अजूनही जवळच जुनी वडसा या नावाने टिकून आहे. दुष्काळी आणि पूरग्रस्त खेड्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी वडसा गाव आणि रेल्वेस्थानक यामधील उपलब्ध जागेवर एक लहान वसाहत उभारली. ब्रिटिश सरकारने त्या वसाहतीला त्यांचेच नाव दिले. देसाई यांचे पूर्ण नाव चंदुलाल चुनीलाल देसाई होते. राजदूत असताना फाळणीनंतरही अडकून पडलेल्या ५० हजारांहून अधिक हिंदूना भारतात आणून देसाई यांनी पुनर्वसित केले. स्वातंत्र्यानंतर वडसाजवळील देसाईगंज वसाहत हळूहळू वाढू लागली. १९५८ला तिथे वीज नसतानासुद्धा ७ राईस मिल होत्या. पुढे १९६०च्या २६ जानेवारीला तिथे वीज पाेहाेचली. १९६१ला देसाईगंज वसाहत, जुनी वडसा आणि बाजूचे नैनपूर हे खेडे जोडून नगरपरिषद घोषित करण्यात आली. आजच्याप्रमाणे तेव्हाही काही लोक याविरोधात कोर्टात गेले होते. पण, शेवटी ग्यानचंद दुनिचंद हे देसाईगंजचे पहिले नगराध्यक्ष झाले. १९५१मध्ये देसाईगंजची लाेकसंख्या केवळ १ हजार ८०० हाेती आणि केवळ १० वर्षात १९६१ पर्यंत ११ हजार लोकवस्तीच्या शहरात नगर परिषद अस्तित्त्वात आली. गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर आरमोरी तालुक्यातील व जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद देसाईगंज येथे हाेती. त्यानंतर १९९२ला देसाईगंज तालुका घोषित झाला. देसाईगंज शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सी. सी. देसाई यांचा स्मृतिस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शहर निर्मितीच्या स्मृती विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पाेहाेचावा, यासाठी येथील अतिक्रमण हटवून सी. सी. देसाई यांच्या स्मृतिस्तंभाचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी शहरवासीयांकडून हाेत आहे.

बाॅक्स

काेण हाेते सी. सी. देसाई?

देसाईगंज हे नाव देणारे सी. सी. देसाई कोण हे दुर्दैवाने आज स्थानिक लोकांनासुद्धा माहीत नाही. कुणी ते मालगुजार, जुने राजकारणी नेते होते असे सांगतात. केवळ ८० ते ९० वर्षांपूर्वी नावारुपाला आलेल्या देसाईगंज शहराच्या स्थापनेचा काळ हा विस्मृतीत गेलेला आहे. १९३३ यावर्षी तत्कालीन चांदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सी. सी. देसाई यांची नेमणूक झाली. देसाई हे अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम जिल्हाधिकारी होते. गुजरातच्या भद्रण या गावी २७ एप्रिल १९०० राेजी जन्मलेले देसाई १९२३मध्ये इंग्लंडमध्ये आय. सी. एस. झाले. १९३० आणि १९४०च्या दशकात मध्य प्रांतात विविध पदांवर कार्यरत देसाई पदोन्नतीने पुढे मध्य प्रांताचे मुख्य सचिव झाले. अतिशय प्रतिष्ठित अशा या प्रशासकाची पुढे १९५४ - ५७ दरम्यान भारताचे राजदूत म्हणून श्रीलंका आणि पाकिस्तान येथे रवानगी झाली.

===Photopath===

230421\23gad_6_23042021_30.jpg

===Caption===

अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले सी.सी देसाई यांचे स्मृतिस्तंभ.