लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीअंतर्गत शेकडो गावांचा समावेश आहे. मात्र अर्ध्याअधिक गावातील २५ वर हातपंप अद्यापही नादुरूस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.एटापल्ली तालुक्याच्या अनेक गावातील हातपंपाच्या चबुतऱ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. हातपंपाच्या चबुतऱ्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत: उखडले आहे. याशिवाय काही हातपंपालगत नाल्या तुटलेल्या असल्याने घाणपाणी हातपंपाच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य पावसाळ्यात धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. नादुरूस्त हातपंपाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली. मात्र हातपंप दुरूस्तीत प्रशासनाच्या वतीने दिरंगाई केली जात आहे.
२५ पेक्षा जास्त हातपंप नादुरूस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:30 AM
एटापल्ली तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीअंतर्गत शेकडो गावांचा समावेश आहे. मात्र अर्ध्याअधिक गावातील २५ वर हातपंप अद्यापही नादुरूस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यातील स्थिती : अधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष