भोसले नॉट रिचेबल : बीएसएनएलमध्ये नोकरी लावून देण्याचे प्रकरणआनंद मांडवे सिरोंचाउस्मानाबाद जिल्ह्यातील जुनोनी गावच्या सचिन रंगनाथ भोसले या इसमाने बीएसएनएलमध्ये नोकरी लावून देणे तसेच ५० हजार ते एक लाख रूपये गुंतविल्यास अल्पावधीत साडेनऊ पट रकमेचा परतावा करण्याच्या आमिषाला अहेरी उपविभागातील ३५ पेक्षा अधिक नागरिक बळी पडले असून त्यांची फसवणूक झाली असल्याचे पुढे आले आहे. फसवणुकीबाबतचे वृत्त लोकमतमध्ये २७ मे रोजी प्रकाशित होताच अन्यायग्रस्तांनी या संदर्भातील पुरक माहिती लोकमतला दिली आहे. आलापल्लीचे मलय्या बकय्या कांबळे, संतोष रूपचंद कविराजवार, एटापल्लीचे सुरेश व्यंकटी दासरवार, दरशेवाडाचे राजाराम येल्ला कावरे, महेश राजाराम कावरे, मरपल्लीचे गंगाराम लचमा मुजमकर, आलापल्लीचे गोमाजी लक्ष्मण तुमडे, टेकडातालाचे मधुकर नारायण नीलम यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबद्दलची माहिती बामणी उपपोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना दिली. यावेळी प्रभारी अधिकारी आशिष चौधरी रजेवर होते. अन्य अधिकारी महेश भंगाळे यांनी प्रभारी नसल्यामुळे याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगितले.पोलिसांनी चामोर्शी येथे सचिन भोसलेची चौकशी केल्याची माहिती आहे. ते पोलीस कोणत्या ठाण्याचे आहे, हे कळू शकले नाही. भोसलेने चामोर्शी येथील गोंड मोहल्ल्यात राहून या फसवणूक नाट्य केले. त्याच्या या प्रतापासून घरमालक व कुटुंबीय अनभिज्ञ आहेत. २७ मे पर्यंत फसवणूक झाल्यांच्या संपर्कात होता. या खातेदारांची रक्कम परत करण्याचे आश्वासनही भोसलेने दिले होते. मात्र पोलिसात तक्रार दिल्यास कायदेशिर कारवाईचा बडगा माझ्यावर उगारला जाईल, शिवाय कोर्टाचा अंतिम निकाल लांबविणार पडल्यास तुमचे पैसेही लवकर मिळणार नाही, असा शहाणपणाचा सल्लाही त्याने दिला होता, असे पीडितांनी सांगितले. त्यानंतर तो आजतागायत नॉट रिचेबल आहे. दरम्यान, त्याचा एक साथीदार सुधाकर विठ्ठल कुमरे रा. नागुलवाही हा सुद्धा भूमिगत झाल्याची माहिती आहे. नावाबद्दल साशंकतायासाऱ्या प्रकारानंतर कथीत सचिनचे नावही बनावटी असल्याची शका अन्यायग्रस्त महेश राजाराम कावरे यांनी व्यक्त केली आहे. ते भोसलेच्या बँक खात्यात १० हजार रूपये भरण्यासाठी गेले. तेथील कर्मचाऱ्याने त्याचे नाव गवळी असल्याचे सांगितले. तेव्हा क्रेडीड स्लिपमधील भोसले खोडून गवळी अशी दुरूस्ती करावी लागली. या व्यवहारात राजाराम व महेश या पितापूत्राचे दोन लाख रूपये फसले आहेत. भोसलेने केवळ बीएसएनएलएच्याच नावाने बनवाबनवी केली, असे नाही. तर त्याने दूरसंचार क्षेत्रातील आयडीआय, एअरटेल, वोडाफोन, रिलायन्स, टॉवर व्हिजन इंडिया इत्यादी कंपनीच्या नावानेही फसवणूक केली आहे. यातील टॉवर व्हिजनचा दोन पानी करारनामा माहिती पत्रकासह अटी, शर्ती व नियमावलीचे पत्रकही गुंतवणुकदारांना दाखविले. सोबत ग्रामपंचायतीच्या नाहरकत प्रमाणपत्राचा नमूनाही दिला. काही ग्रामपंचायतीने व्यापक जनहितासाठी ठरासह तसेच प्रमाणपत्र अतितत्परतेने दिले आहे, असे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात टॉवर उभारण्यासाठी त्या कंपन्यांनी अधिकृतरित्या मला प्राधिकारी म्हणून नेमले आहे, अशी बतावणी केली. काही खातेदारांच्या घरी पत्नी व मुलाबाळांसह मुक्काम ठोकून भोसलेने पाहुणचारही झोडला असल्याची माहिती आहे. ‘ट्राय’चे जनतेला आवाहन२७ मे लोकमतच्या अंकात या घपलेबाजीचे पहिले वृत्त धडकले. २९ मे रोजी नवी दिल्ली येथील टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडियाने (ट्राय) वृत्तपत्रात जनहितार्थ यासंदर्भात जाहिरात दिली आहे. त्या १३ ओळ्याच्या जाहिरातीत ट्राय किंवा दूरसंचार विभाग मोबाईल टॉवरची स्थापना करण्यासाठी परिसराच्या भाड्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समाविष्ट राहत नाही, असे म्हटले आहे. कोणत्याही संशयाच्या बाबतीत डीओटीच्या स्थानिक टर्मसेलशी संपर्क साधण्याचेही आवाहन जाहिरातूमधून जनतेला केले आहे.
३५ पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक
By admin | Published: June 04, 2016 1:24 AM