शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

४०० वर शिक्षक ठरले अतिरिक्त

By admin | Published: July 08, 2016 1:23 AM

इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय गल्लीबोळात कान्व्हेंट सुरू करण्यात आले आहे.

समायोजन थंडबस्त्यात : विद्यार्थी पटसंख्या रोडावल्याचा परिणामदिलीप दहेलकर गडचिरोलीइंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय गल्लीबोळात कान्व्हेंट सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी कमी व शाळांची संख्या जास्त या परिस्थतीमुळे शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सन २०१५-१६ च्या संचमान्यतानुसार जिल्हा परिषद शाळांमधील एकूण २३७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत तर खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील १६१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. सद्य:स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग मिळून एकूण ४९८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मात्र सदर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया तुर्तास थंडबस्त्यात आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी विद्यार्थी पटसंख्येची माहिती मागविली जाते. त्यानंतर शिक्षक पदांची निश्चिती करण्यासाठी संचमान्यता केली जाते. सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची एकूण ३ हजार ६०४ पदे मंजूर आहेत. यापैकी ३ हजार ८४० पदे भरण्यात आली आहेत. तब्बल २३६ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. जि.प. शाळांमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण ९१ पदांना मंजुरी आहे. यापैकी १९२ पदे भरण्यात आली असून १०१ उच्च श्रेणी मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात शिक्षक संवर्गातील एकूण ४ हजार ५२२ पदे मंजूर आहेत. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार १६१ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. या संदर्भाची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने १० दिवसांपूर्वी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर जाहीर केली होती. त्यानंतर हरकती व आक्षेप स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संबंधित अतिरिक्त शिक्षकांच्या पदांबाबत सुनावणी घेण्याची प्रक्रिया माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सुरू असल्याची माहिती आहे. सन २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत एकूण १६१ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी तसेच इयत्ता नववी ते दहावीपर्यंतच्या वर्गावर नियुक्त असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. माध्यमिक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचा अतिरिक्त ठरलेल्या पदांमध्ये समावेश आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया यात जाणून घेता आली नाही.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी विद्यार्थी पटसंख्येची माहिती मागविली जाते. त्यानंतर शिक्षक पदांची निश्चिती करण्यासाठी संचमान्यता केली जाते. सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची एकूण ३ हजार ६०४ पदे मंजूर आहेत. यापैकी ३ हजार ८४० पदे भरण्यात आली आहेत. तब्बल २३६ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. जि.प. शाळांमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण ९१ पदांना मंजुरी आहे. यापैकी १९२ पदे भरण्यात आली असून १०१ उच्च श्रेणी मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात शिक्षक संवर्गातील एकूण ४ हजार ५२२ पदे मंजूर आहेत. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार १६१ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. या संदर्भाची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने १० दिवसांपूर्वी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर जाहीर केली होती. त्यानंतर हरकती व आक्षेप स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संबंधित अतिरिक्त शिक्षकांच्या पदांबाबत सुनावणी घेण्याची प्रक्रिया माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सुरू असल्याची माहिती आहे. सन २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत एकूण १६१ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी तसेच इयत्ता नववी ते दहावीपर्यंतच्या वर्गावर नियुक्त असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. माध्यमिक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचा अतिरिक्त ठरलेल्या पदांमध्ये समावेश आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया यात जाणून घेता आली नाही.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत पदवीधर शिक्षकांची जिल्ह्यात एकूण ८२७ पदे मंजूर आहेत. यापैकी २९८ पदे भरण्यात आली आहेत. पुन्हा ५२९ पदवीधर शिक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे. अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांचे पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन केल्यास २३८ पदे भरणे शक्य होईल. त्यानंतरही पदवीधर शिक्षकांच्या जिल्ह्यात तब्बल २९३ जागा रिक्त राहणार आहेत. शिक्षक समायोजनाचा चेंडू न्यायालयातपात्रतेनुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदावन्नत करता येत नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडपीठात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक पदोन्नतीची कार्यवाही करता येत नाही. परिणामी अतिरिक्त शिक्षकांचे समयोजन तुर्तास करता येत नाही. अशा आशयाचा अहवाल जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे ३१ मे २०१६ रोजी पत्रानिशी सादर केला आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षकांची पदोन्नती व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.