लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील वडसाकला येथील तेंदूपत्ता मजुरांना एक वर्षापासून तेंदूपत्ता बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम लवकर द्यावी, या मागणीसाठी गावातील नागरिकांनी एटापल्ली येथील स्टेट बँकेसमोर आंदोलन करून व्यवस्थापकांना निवेदन सादर केले.तेंदूपत्ता मजुरांची बोनसची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करायची होती. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. यासाठी अनेकवेळा पाठपुरावाही करण्यात आला. मात्र रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे तेंदूपत्ता मजुरांनी तसेच कोष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेसमोर धरणे आंदोलन केले.यावेळी कोष समिती सदस्य गजानन नरोटे, मधुकर मंगर यांच्यासह सुरेश बारसागडे व गावातील तेंदूपत्ता मजूर उपस्थित होते. नेमक्या कोणत्या कारणामुळे बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली नाही, याची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन शाखा व्यवस्थापक यांना दिले आहे.
तेंदूपत्ता बोनससाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:38 AM
तालुक्यातील वडसाकला येथील तेंदूपत्ता मजुरांना एक वर्षापासून तेंदूपत्ता बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम लवकर द्यावी, या मागणीसाठी गावातील नागरिकांनी एटापल्ली येथील स्टेट बँकेसमोर आंदोलन करून व्यवस्थापकांना निवेदन सादर केले.
ठळक मुद्देएटापल्ली : वडसाकला येथील मजुरांचा बोनस थकीत