लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल करावी, तसेच धानाचे चुकारे द्यावे, या मागणीसाठी शेतकºयांनी कुरखेडा, देसाईगंज मार्गावरील चिखली फाट्यावर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले.आदिवासी विविध कार्यकारी संस्थामार्फत धानाची खरेदी केली जात आहे. मात्र धानाची उचल केली जात नसल्याने धानाच्या पोत्यांचे मोठमोठे ढिग खरेदी केंद्राच्या परिसरात जमा झाले आहेत. पाऊस आल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. धानाची उचल झाली नसल्याने काही विविध कार्यकारी सहकारी संस्था नवीन धान खरेदी करण्यास नकार देत आहेत.मार्च महिना जवळ येत आहे. शेतकºयांना पीक कर्ज भरायचे असल्याने धान विक्रीची लगबग वाढली आहे. मात्र धान खरेदी केंद्र बंद पडल्याने शेतकºयांचे अडचणी वाढले आहेत. तसेच दोन महिन्यांपासून धानाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कुरखेडा तालुक्यातील शेतकºयांनी चिखली फाट्यावर चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनाची दखल घेत ठाणेदार सुरेश चिल्लावार यांनी आविमचे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलेश सोरपडे, विपणन निरिक्षक पंधरे, नायब तहसीलदार सुधाकर मडावी यांना आंदोलनस्थळी बोलाविले.अधिकाºयांनी आंदोलक शेतकºयांशी चर्चा केली. निलेश सोरपडे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. आठ दिवसात धानाचे चुकारे दिले जातील. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावरील धानाची उचल केली जाईल. जागेअभावी कोणतेही धान खरेदी केंद्र बंद राहणार नाही, असे लेखी आश्वासन सोरपडे यांनी दिले. आठ दिवसांत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.आंदोलनात गणपत सोनकुसरे, व्यंकटी नागिलवार, घिसू खुणे, यशवंत चौरीकर, गणू उसेंडी, मनोहर लांजेवार, मधुकर शेंडे, रमेश तुलावी, विजय डहाळे, येनीदास कवरके, सुनील किलनाके, जीवन मेश्राम, केशव किरसान, चरण बन्सोड, दशरथ लाडे, कैलास उईके, कृष्णा कोराम, रामधन तुलावी, रामा ताराम, शालिकराम हरडे, राजेश उईके, मंगेश कवडो, वामन ठलाल, कृष्णा पाठणकर, विश्वनाथ ठलाल, तेजराम पिलारे, तेजराम बुध्दे, परसराम म्हरस्कोल्हे, माणिक गायकवाड, विनाय कुथे, गुणाजी गाडेगोणे, आसुलाल पालिवाल, अजय गायकवाड, सुभाष गावडे, सिताराम गावडे, हिराजी माकडे यांनी सहभाग घेतला.
केंद्रावरील धानाची उचल करण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:42 PM
आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल करावी, तसेच धानाचे चुकारे द्यावे, या मागणीसाठी शेतकºयांनी कुरखेडा, देसाईगंज मार्गावरील चिखली फाट्यावर सोमवारी चक्काजाम आंदोलन केले.
ठळक मुद्देरखडलेले चुकारे द्या : कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांमार्फत रस्ता रोको