शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खासदारांनी घेतले विसापूर दत्तक

By admin | Published: November 10, 2014 10:42 PM

‘खासदार दत्तकग्राम’ योजनेंतर्गत प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेत आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी

खासग्राममध्ये झाला कार्यक्रम : मतदार संघातील एक गाव दत्तक घेण्याचा पार पडला सोहळातळोधी (मो.) : ‘खासदार दत्तकग्राम’ योजनेंतर्गत प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेत आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी तालुक्यातील विसापूर हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तळोधी मो. पासून ५ किमी अंतरावर असलेल्या या गावात आज या संदर्भात सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री रामेश्वर सेलुकर, उपसरपंच बंडू नरोटे, पं. स. उपसभापती केशव भांडेकर, डॉ. भारत खटी, रवी बोमनवार, अशोक पोरेड्डीवार, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जयराम चलाख, विलास गण्यारपवार, आनंद गण्यारपवार, मनमोहन बंडावार, अब्बासभाई, अस्लम खान, संतोष तिवारी, ग्रामसेवक जयसिंग गावीत, विस्तार अधिकारी भैयाजी मुद्देमवार, पोलीस पाटील नंदा पेंदाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोनपाल सांबळे, उपाध्यक्ष रोहिदास भांडेकर, ग्रा. प. सदस्य राजू बारसागडे आदी उपस्थित होते. खासदार निधीतून प्रत्येक वर्षाला एक गाव आदर्श करण्याचा संकल्प आहे. यात जनसहभाग आवश्यक आहे. विसापूर गावाला दत्तक घेऊन ५ लाखाचा निधी देण्याची घोषणा खा. अशोक नेते यांनी यावेळी केली. तसेच शौचालय बांधकामाचे महत्व, जनधन योजना याची माहिती ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. आपल्या लोकसभा क्षेत्रात २० तालुके आहेत. ७५० किमीचे अंतर कापून प्रत्येकांशी व्यक्तीगत संपर्क ठेवणे शक्य नाही. त्यामुळे जनतेच्या माध्यमातूनच आपल्या समस्या पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आनंद गण्यारपवार यांनी ग्रामस्थांना पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. तर संतोष तिवारी यांनी हागंदारीमुक्ती व केशव भांडेकर यांनी आरोग्यविषयक प्रश्नांवर मार्गदर्शन केले.विलास गण्यारपवार यांनी आम्लपदार्थाच्या दुष्परिणामाबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र पदा तर प्रास्ताविक व आभार बंडू नरोटे यांनी मानले. (वार्ताहर)