लोकमत न्यूज नेटवर्कघोट : खा. अशोक नेते यांनी रेगडी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी शिक्षण व भौतिक सुविधांच्या मुद्यावर संवाद साधला.रेगडी आश्रमशाळेची इयत्ता चवथीची विद्यार्थीनी जिमू हेडो हिची प्रकृती बिघडल्याने तिला २२ जानेवारी रोजी सकाळी रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अधिकच ढासळल्याने रेगडी येथून तिला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खा. नेते यांनी रेगडी आश्रमशाळेला भेट दिली. येथे विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा नाही. बेड, वॉटर फिल्टर व वसतिगृह आदी सुविधांचा येथे अभाव असल्याचे खासदारांच्या निदर्शनास आले. विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी केली आहे. आश्रमशाळेतील विविध समस्यांबाबत नेते यांनी तेथील शिक्षकांशी चर्चा केली.
खासदारांनी जाणल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:57 PM
खा. अशोक नेते यांनी रेगडी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी शिक्षण व भौतिक सुविधांच्या मुद्यावर संवाद साधला.
ठळक मुद्दे रेगडी आश्रमशाळेला भेट : विद्यार्थी मृत्यू प्रकरणाची चौकशी करा