ही परीक्षा शांततेत पार पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिकाराचा वापर करून दिनांक ४ सप्टेंबर राेजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ कलम लागू केले आहे.
परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास व परीक्षा सुरू असण्याच्या संपूर्ण कालावधीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाइल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परीक्षेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून इतरांना एकत्रितरीत्या प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करू नये. कोविड-१९ च्या अनुषंगाने, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.