लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगातर्फे विविध पदासांठी परीक्षा घेतली जाते. प्रसंगी या परीक्षांमध्ये युवकांना अपयश येते. मात्र, अपयश आले म्हणून खचून न जाता युवांनी पुन्हा नव्या उमेदीने तयारीला लागून राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध विभागांच्या पदभरतीतही पूर्ण ताकदीने उतरल्यास त्यांचे करिअर घडू शकते.जागतिकीकरणानंतर खासगी क्षेत्रातही नाेकऱ्यांचे दालन उघडले खरे; परंतु कालांतराने अभियांत्रिकी व आयटी क्षेत्रामधील राेजगारावर कुऱ्हाड काेसळली. काेराेनामुळे काही कालावधीसाठी पदभरतीला ब्रेक लागला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह काहीसा कमी झाला. आता काेराेनाचे संकट काहीसे दूर झाल्यामुळे आता युवक व युवतींच्या आशा पल्लवित झाल्या असून ते अभ्यासाला लागले आहेत. अभ्यासिका, तसेच स्पर्धा परीक्षेचे वर्गही सुरू झाल्याने पुन्हा युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. गडचिराेली जिल्ह्यातही आता जनजागृती झाल्यामुळे अनेक युवक, युवती स्पर्धा परीक्षेसाेबतच विविध विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेची तयारी करीत आहे. या जिल्ह्यातूनही मेहनतीच्या भरवशावर स्पर्धा परीक्षेतून अनेक अधिकारी घडले आहेत.
२९० पदांसाठी हाेणार परीक्षामहाराष्ट्र लाेकसेवा आयाेग राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०२१ ही महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्गातील एकूण २९० पदांसाठी २ जानेवारी २०२२ राेजी जिल्हास्तरावरील केंद्रावर घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू, दिव्यांग आदींसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत. यातून युवकांना नाेकरीची संधी आहे.
अथक प्रयत्नाने परीक्षेत यश निश्चित
गडचिराेलीसारख्या मागास जिल्ह्यातही युवक व युवतींमध्ये माेठे काैशल्य आहे. अथक परीश्रम, सातत्य, याेग्य मार्गदर्शन आदींच्या भरवशावर स्पर्धा परीक्षा, तसेच विविध पदांच्या भरती प्रक्रियेत युवक व युवतींना यश मिळविता येते. जिल्ह्याच्या युवकांमध्येही स्पर्धा परीक्षेत यशस्वी हाेण्याची क्षमता आहे. ती ओळखून प्रयत्न करणे गरजेचे आहे.- रवींद्र हाेळी, तहसीलदार
- महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगातर्फे हाेणाऱ्या विविध २९० पदांसाठी ५ ते २५ ऑक्टाेबरदरम्यान उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने एमपीएससीच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना ३४४, तर इतर उमेदवारांना ५४४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी नेट बॅंकिंग करता येणार आहे.
सकारात्मक दृष्टिकाेन व प्रयत्नात सातत्य हवे
स्पर्धा परीक्षा व विविध विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठी कठाेर मेहनतीसाेबतच सकारात्मक दृष्टिकाेन व प्रयत्नात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. केवळ वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातच करिअरची संधी आहे असे नव्हे, विविध विभागाच्या माेठ्या पदावर जाऊन समाजाची सेवा करता येते. जिल्हा विकासासाठी हातभारही लावता येताे.- प्रतीक्षा नक्षीने, वन परिक्षेत्राधिकारी.
यशस्वी विद्यार्थ्यांची या पदांवर हाेऊ शकते निवड
- महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगातर्फे महाराष्ट्रातील विविध विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण २९० पदांसाठी भरती प्रक्रिया हाेत असून लेखी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गट अ (१२ पदे), पाेलीस उपअधीक्षक/ सहायक पाेलीस आयुक्त गट अ (१६ पदे), सहायक राज्यकर आयुक्त गट अ (१६ पदे), गट विकास अधिकारी व तत्सम पदे (१५), सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (१५ पदे), सहायक कामगार आयुक्त गट अ (२२ पदे), उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे (२५ पदे), कक्ष अधिकारी गट ब (३९ पदे), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट ब), सहायक गट विकास अधिकारी (१७ पदे), सहायक निबंधक सहकारी संस्था १८ पदे आदींवर गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.