उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या संकल्पनेतून भामरगड तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी विध्यार्थ्यांना मोफत एमएससीआयटी प्रशिक्षण दिले जात आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी पोउपनि मंगेश कराडे, ज्ञानेश्वर भोसले, संघमित्रा बांबोळे यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाकरिता एन.आर. मरिन ट्रेडिंग कंपनी मुंबई यांचे मालक रियाज शेख, एन.टी.बी. इंटरनॅशनल प्रा.लि. कंपनी पुणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुंजन नवल, सहायक प्रबंधक अनिल रासकर व पोलीस निरिक्षक किरण रासकर यांच्या सहकार्यातून भामरागड पोलिसांनी दुर्गम भागात जाऊन होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्रथमतःच २० विद्यार्थ्यांना एमएससीआयटी मोफत प्रशिक्षण वंदना कॉम्प्युटर, भामरागड येथे देण्यात येत आहे.
===Photopath===
290621\img-20210626-wa0010.jpg
===Caption===
प्रशिणार्थी सोबत भामरगड पो स्टे चे अधिकारी वकर्मचारी