ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पाच हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम महावितरण कंपनीने सुरू केली असून मागील पाच दिवसात चंद्रपूर परिमंडळातील १ हजार ३६६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.थकबाकीमुळे वीज वितरण कंपनी अडचणीत आली आहे. केंद्र शासनाकडून नगदी स्वरूपात वीज खरेदी करावी लागते. मात्र ग्राहक वीज बिलाचा भरणा महिना उलटूनही करीत नाही. परिणामी वीज वितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. त्यामुळे एकूण मागणीच्या किमान ९५ टक्के वीज बिलाची वसुली प्रत्येक महिन्यात करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश मंडळ कार्यालय, परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाºयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक वीज कंपनीचे अधिकारी कारवाई करीत आहेत.कारवाई करताना लहान ग्राहकांपेक्षा मोठ्या ग्राहकांवर कारवाई करण्यास अधिक भर दिला जात आहे. पाच हजार पेक्षा अधिक रूपयांचे बिल ज्या ग्राहकाकडे थकीत आहे, अशा ग्राहकांची यादी तयार करून सदर ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. चंद्रपूर परिमंडळात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश होतो. घरगुती ग्राहकांकडे ८ कोटी ६५ लाख, वाणिज्यीक ग्राहकांकडे ३ कोटी २३ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ५७ लाख ९५ हजार, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडे १ कोटी ३५ लाख, शासकीय कार्यालयांकडे ९४ लाख ६३ हजार, कृषिपंपधारकांकडे ७१ कोटी ५३ लाख रूपयांचे वीज बिल थकले आहे.महावितरणने कारवाई करीत १ हजार ३६६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर या कारवाईची धास्ती घेत सुमारे ६ हजार ६३३ ग्राहकांनी १ कोटी ३० लाख ६९ हजार रूपयांचा भरणा केला आहे. सदर कारवाई आणखी काही दिवस चालू राहणार आहे. वीज बिलाचा भरणा कधीना कधी संबंधित ग्राहकाला करावाच लागतो. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्या संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला काही दिवस अंधारात घालावे लागतात. त्याचबरोबर मानसिक त्रासही होतो. हे टाळण्यासाठी बिल भरण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे.
थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:06 AM
पाच हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम महावितरण कंपनीने सुरू केली असून मागील पाच दिवसात चंद्रपूर परिमंडळातील १ हजार ३६६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
ठळक मुद्देपाच दिवसांत : १ हजार ३६६ ग्राहकांची वीज खंडित