गडचिरोली : थकीत वीज बिलाविरोधात महावितरणतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्षभरापासून वीज थकविलेल्या २९२ वीज ग्राहकांकडून ८ लाख ८० हजार रूपये वसूल केले आहेत. त्याचबरोबर ज्या ग्राहकांकडे जास्त महिन्याचे वीज बिल थकीत राहिल त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीमही हाती घेतली जाणार आहे. प्रत्येक कामासाठी विजेचा वापर होत असल्याने वीज ही अत्यावश्यक गरज आहे. गडचिरोली जिल्ह्यात विजेचे दोन लाखांहून अधिक ग्राहक आहेत. वीज बिल थकीत राहत असल्याने वीज कंपनी आर्थिक अडचणीत येत असल्याचे लक्षात घेऊन मागील चार वर्षांपासून महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. मात्र काही ग्राहक या धोरणालाही फाटा देत १० ते १२ महिने उलटूनही वीज बिलाचा भरणा करीत नसल्याचे दिसून आले. वीज कंपनीने प्रत्येक जिल्हा कार्यालयाला याबाबत सक्त वसुलीचे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली विभागातील १९२ व गडचिरोली विभागातील वीज ग्राहकांनी मागील वर्षभरापासून वीज बिलाचा भरणाच केला नव्हता. आलापल्ली विभागातील या वीज ग्राहकांकडे ३ लाख ८० हजार व गडचिरोली विभागातील ग्राहकांकडे ५ लाख रूपये थकीत पडले होते. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ग्राहकांकडून थकीत बिलाची रक्कम वसूल केली आहे. वीज विभागाच्या या कडक धोरणामुळे थकीत वीज बिल ठेवणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. या धोरणामुळे थकीत वीज बिलाचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (नगर प्रतिनिधी)नवीन वर्षापासून वीज बिल भरा, अन्यथा अंधारात रहा!४वीज बिल थकीत ठेवणाऱ्या ग्राहकांविरोधात वीज वितरण कंपनीने नवीन वर्षांपासून आक्रमक धोरण अवलंबिले आहे. जे वीज ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करणार नाही, त्या ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी मान्य न करता सरळ वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जाईल. मात्र जे ग्राहक नियमितपणे वीज बिलाचा भरणा करतात, अशा ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महावितरणने केली ८.५ लाखांची वसुली
By admin | Published: January 01, 2016 2:13 AM