सिरोंचा नगरपंचायतला महाविरणकडून ४९ लाखांचे बिल पाठविण्यात आले. त्या बिलाचा भरणा करण्यात न आल्याने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांना विचारणा केली असता. महावितरणकडून अवाजवी बिल पाठविण्यात आले. वीस लाखांच्या व्याजासह ४९ लाखांचे बिल आले. रिंडिंग न घेता मनमानी बिलाची आकारणी केली. दरमहा बिल न देता एकदम देण्यात आले. सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. व्याजाची रक्कम माफ करुन बिल दुरुस्ती करून देण्यासाठी सांगितले आहे. बिल दुरुस्ती करून मिळताच सध्या दहा लाखांचा भरणा करण्यात येईल व पथदिवे लवकरच चालू करण्यात येईल असे सांगितले.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यावर सगळीकडेच अंधार पसरलेला राहते. रस्त्यावरील जनावरे, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका असतो. पहाटे ५.३०ची बस पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना खूपच त्रास होतो. भुरट्या चोरीचा प्रकार होण्याची शक्यता असते. अंधारामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.