ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोलीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या मुडझा येथील कोंबडा बाजारावर गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी रविववारी सकाळी १० वाजता धाड टाकून सुमारे १३ लाख ४८ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २० आरोपींना अटक केली असून १९ आरोपी फरार आहेत.अटक केलेल्या आरोपींमध्ये पद्माकर दामोधर कांबळे (३१) रा. मुडझा, सुनील प्रभाकर चौधरी (२५) रा. मुडझा, अमोल सुखदेव होळीकर (१९) रा. नवेगाव, अभिजीत संजय नांदेकर (२०) रा. नवेगाव, सोमेश्वर गोविंदा नागोसे (४८) रा. कनेरी, अमोल तुळशीदास चव्हाण (२०) रा. नवेगाव, बबन भगवान मंगर (२२) रा. मंगरमेंढा तालुका सावली, नवीन भोला पटेल (२६) रा. नवेगाव, तुकाराम सोनू कांबळे (५०) रा. कोटगल, आनंद गंगाराम कंकलवार (२९) रा. कोटगल, यशवंत सोमाजी दाणे (४७) रा. नवेगाव, जनार्धन यादव मेश्राम (३१) रा. गोकुलनगर, रतन उर्फ प्रकाश बाबुराव टिंगुसले (३७) रा. गोकुलनगर, राजकुमार हरिजी गेडाम (३६) रा. साखरा, संतोष बापूजी धारणे (२१) रा. विहिरगाव तालुका सावली, उमाकांत माधव म्हशाखेत्री (३७) रा. विसापूर, प्रकाश विठ्ठल जाधव (४०) रा. पाथरी तालुका सावली, मयुर विजय कांबळे (२०) रा. राजुरा, भक्तदास कवडूजी पालकर (२६) रा. पुलखल, रोशन बालाजी आलाम (२२) रा. एटापल्ली या २० आरोपींचा समावेश आहे. त्याचबरोबर १९ आरोपी फरार आहेत.घटनास्थळावरून एकूण १९ दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांची किंमत १३ लाख २५ हजार रूपये होते. आरोपींची अंगझळती घेतली असता, ४ हजार ९२० रूपये नगदी मिळाले. १४ हजार ३०० रूपये किमतीचा मोबाईल व ७ नग कोंबडे घटनास्थळावरून जप्त केले. त्यांची किंमत ४ हजार २०० रूपये आहे. असा एकूण १३ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.मुडझा येथील गावालगत असलेल्या झुडूपी जंगलात सुनील चौधरी व पद्माकर कांबळे हे कोंबडा बाजार भरवित असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, गडचिरोली पोलीस स्टेशनचे नवीन ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांनी रविवारी कोंबडा बाजारावर धाड टाकली. यावेळी त्यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक उदार, पोलीस उपनिरीक्षक सीसाळ, दांडगे, महिला पोलीस उपनिरीक्षक नैैताम, चौधरी, सहायक फौजदार मेश्राम, कुडावले, रोहणकर, पोलीस हवालदार चौधरी, कुमरे, धुर्वे, मानकर, धरणी, रामटेके, पोलीस नाईक गौरकर, सुरवसे, लेनगुरे यांनी केली.कारवाई करतेवेळी प्रमोद उमरगुंंडावार, बिजाजी चौधरी हे पंच होते. गडचिरोलीचे ठाणेदार म्हणून दीपरत्न गायकवाड यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आठ दिवसांतच त्यांनी कोंबडा बाजारावर मोठी कारवाई केली. त्यामुळे दारू व्यावसायिक, सट्टापट्टीधारकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या कार्यकाळात अवैैध धद्यांना वचक बसेल, अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे.अवैैध व्यावसायिक धास्तावलेगडचिरोलीचे ठाणेदार म्हणून दीपरत्न गायकवाड यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आठ दिवसांच्या आत त्यांनी कोंबडा बाजारावर मोठी कारवाई केली. सुमारे १३ लाख ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील एक वर्षातील कोंबडा बाजारावरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानली जात आहे. नक्षलवादाच्या भीतीमुळे दुर्गम भागात पोलीस जात नाही. याचा गैरफायदा घेतला जात असून मोठ्या प्रमाणावर कोंबडा बाजार दुर्गम भागात भरविला जातो. कोंबडा बाजारात लाखो रूपयांचा जुगार खेळाला जातो. त्यामुळे या भागांकडेही लक्ष वळवून कारवाई करणे आवश्यक आहे.
मुडझा कोंबड बाजारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:09 AM
गडचिरोलीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या मुडझा येथील कोंबडा बाजारावर गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी रविववारी सकाळी १० वाजता धाड टाकून सुमारे १३ लाख ४८ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २० आरोपींना अटक केली असून १९ आरोपी फरार आहेत.
ठळक मुद्दे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त : २० आरोपींना अटक; १९ फरार; ७ कोंबडे, १९ दुचाकी ताब्यात