भूमिगत गटार लाइन योजनेच्या कामामुळे अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या कामाच्या मातीमुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजलेल्या आहेत. पावसाळा तोंडावर असताना नगर परिषदेने कोणत्याही प्रकारे पूर्वनियोजन केलेले नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कोरोना आजाराची साथ असताना गढून पाणीपुरवठ्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्वरित पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवक सतीश विधाते यांनी केली आहे.
बाॅक्स
पुलाचे बांधकाम संथ गतीने
गडचिरोली-चामोर्शी महामार्गाचे काम सुरू होऊन ६-७ महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही केमिस्ट भवनजवळ असलेल्या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या या नाल्यातील पाणी पाइपद्वारे वळविण्यात आले असल्याने कन्नमवारनगरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये सांडपाणी साचून आहे. २५ मेपासून पावसाच्या नक्षत्राला सुरुवात हाेणार आहे. त्यामुळे कधीही पाऊस येऊ शकताे. एक पाऊस झाला तरी कन्नमवारनगर पाण्याखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच या रस्त्याचे काम सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन प्रभावित झाली आहे. यामुळे अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, असेही विधाते यांनी म्हटले आहे.