लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुक्तीपथ अभियानाच्या पुढाकारातून नगर पालिका प्रशासनाच्या तंबाखू विरोधी पथकाने सात दुकानांची झडती घेतली. दरम्यान शहरातील चार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.गडचिरोली शहर १०० टक्के तंबाखूमुक्त करण्यासाठी किराणा असोसिएशन व मुक्तीपथ अभियानाची वाटचाल सुरू आहे. यासाठी मुक्तीपथ व किराणा असोसिएशनची बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व किराणा विक्रेत्यानी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा सवार्नुमते निर्णय घेतला होता. मात्र, शहरातील काही दुकानदारांनी जिल्हयाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच ठेवली.याबाबतची माहिती नगर पालिका प्रशासनाला मिळताच शहरातील एकूण सात दुकानांवर धाड टाकून तपासणी केली. यावेळी चार दुकानांनामध्ये एक पोता बारीक तंबाखू, एक पोता आनंद तंबाखू पुडे, खरा पन्नी व इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. सदर मुद्देमाल जप्त करून चार दुकांदारांकडून एकूण सात हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची तंबी देण्यात आली आहे.सदर कारवाई न.प.चे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांच्या मार्गदर्शनात तंबाखू विरोधी पथकातील बबू शेख, भूपेंद्र मंदिरकर, मधुकर लटारे यांनी केली. यावेळी मुक्तीपथचे तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते. गडचिरोली शहरात छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची आयात होत आहे. या आयातीवर मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांची करडी नजर आहे.१३ किलो प्लास्टिक पिशव्या जप्तगडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी शुक्रवारला शहरात प्लास्टिक पिशवी जप्ती मोहीम राबविण्यात आली. दरम्यान पालिकेच्या पथकाने इंदिरा गांधी चौक, आठवडी बाजार त्रिमूर्ती चौक परिसरातील दुकानांची तपासणी केली. पाच किराणा दुकान, जनरल स्टोर्समध्ये धडक कारवाई करून या दुकानातून १३ किलो प्लास्टिकच्या पिशव्या व साहित्य जप्त केल्या. संबंधित दुकानदारांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत सांगण्यात आले. शहरातील विक्रेते व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने या कारवाईदरम्यान केले. मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या मार्गदर्शनात पथकाने त्रिमूर्ती चौक परिसरातील बाजारपेठेत प्लास्टिक जप्तीची मोहीम कडक करावी, अशी मागणी होत आहे.
नगरपालिकेच्या तंबाखूविरोधी पथकाची शहरातील किराणा दुकानांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:00 AM
गडचिरोली शहर १०० टक्के तंबाखूमुक्त करण्यासाठी किराणा असोसिएशन व मुक्तीपथ अभियानाची वाटचाल सुरू आहे. यासाठी मुक्तीपथ व किराणा असोसिएशनची बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व किराणा विक्रेत्यानी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा सवार्नुमते निर्णय घेतला होता. मात्र, शहरातील काही दुकानदारांनी जिल्हयाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच ठेवली.
ठळक मुद्देचार दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थ जप्त । दंडात्मक कारवाई करून दिली तंबी