लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगर परिषदेत पार पडली. या सभेत ई-टेंडरींग झालेल्या १८ विकासकामांना मंजुरी दिली आहे. नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतरची ही तिसरी सर्वसाधारण सभा होती. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेला नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती गुलाब मडावी, अल्का पोहणकर, आनंद श्रुंगारपवार, केशव निंबोड, नितीन उंदीरवाडे उपसभापती वैष्णवी नैताम यांच्यासह नगरसेवक संजय मेश्राम, वर्षा नैताम, प्रविण वाघरे, रितू कोलते, अनिता विश्रोजवार, लता लाटकर, सतीश विधाते, रमेश चौधरी, निता उंदीरवाडे, भुपेश कुळमेथे, मंजुषा आखाडे, मुक्तेश्वर काटवे, गीता पोटावी, रंजना गेडाम, पूजा बोबाटे, वर्षा बट्टे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत शहरात उपजीविका केंद्र बांधणे, नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन करणे, देसाईगंज-गडचिरोलीपर्यंत प्रस्तावित असलेला मार्ग नगर परिषद क्षेत्रातून जात असल्याने त्याला नाहरकत प्रमाणपत्र देणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत गडचिरोली शहर हागणदारीमुक्त झाल्याबाबतचा निर्णय घेणे, जलशुध्दीकरण केंद्रातील पंपहाऊसमध्ये विद्युत जोडणीचे नुतनीकरण करणे, जीवन प्राधिकरणास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करणे, झाडे खरेदी करून रोपण करणे, त्यांच्या संरक्षणाकरिता ट्रीगार्ड खरेदी करणे, झाडांना पाणी टाकणे व संगोपण करणे यासाठी निविदा मागविणे, १० प्राथमिक शाळेकरीता डेस्क व बेंच खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
नगर परिषद सर्वसाधारण सभेत १८ कामांना मंजुरी
By admin | Published: June 10, 2017 1:40 AM