दुर्योधन रायपुरे यांचा मृतदेह फुले वाॅर्डातील त्यांच्याच घरात आढळला होता. अविवाहित असल्यामुळे ते वडिलोपार्जित घरात एकटेच राहात होते. त्यांच्या घराला लागूनच त्यांच्या भावाचे घर आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने कोणाच्याही कामासाठी धावून जात होते. व्यवसायातून कमावलेल्या पैशाच्या वादातून त्यांच्या ओळखीच्याच व्यक्तीने त्यांचा गेम केल्याची चर्चा सुरू आहे. श्वान पथकाने आरमोरी मार्गावरील एका शेतापर्यंतचा रस्ता दाखविला होता. त्यावरून आरोपी तेथून वाहनाने पसार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
(बॉक्स)
मोबाईलने केला घात?
पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून ताब्यात घेतलेला आरोपी वाहन चालक असल्याचे समजते. हत्येनंतर आरोपी ज्या वाहनाने पसार झाले ते वाहन सदर आरोपी चालवत होता. या हत्येनंतर मृत रायपुरे यांचा मोबाईल तिथे पडला. तो या चालकाने स्वत:जवळ ठेवला. घरी गेल्यानंतर त्याने तो बंद केला. पण तोपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील टॉवरने त्या मोबाईलचे सिग्नल पकडले होते. त्यावरून माग काढत पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतल्याचे समजते.