आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर झालेला हल्ला भ्याड व संतापजनक असल्यामुळे या हल्ल्याचा निषेध करत हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, हल्लेखोराला शिक्षा झालीच पाहिजे असा निर्धार व्यक्त करून कामबंद आंदोलन करीत घटनेचा निषेध केला. आवश्यक सेवा वगळता सर्व कामकाज बंद होते. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चौधरी, लेखापाल जगदीश नक्षिने, स्थापत्य अभियंता निखिल कारेकार, कार्यालय अधीक्षक मोरेश्वर पेंदाम, कर निरीक्षक भारत वासेकर, लिपिक विजय पेदीवार, रमेश धोडरे, श्रीकांत नैताम, बाळा धोडरे, प्रभाकर कोसरे, संतोष भांडेकर, अब्दुल हापिज सय्यद, वीजतंत्री दिलीप लाडे, श्रीकृष्ण भसारकर, प्रमोद राऊत, विलास कोहळे, सरस्वती राऊत, सुभाष कनकुटलावार, सोनी पिपरे, रमेश कनकुटलावार, अरुण गहाने, स्नेहल भुरसे आदी कर्मचारी उपस्थित होते. शासनाने या घटनेतील गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सतीश चौधरी, लेखापाल जगदीश नक्षिने, अब्दुल सय्यद आदी हजर हाेते.
310821\img-20210831-wa0127.jpg
ऩ प .निषेध फोटो