एप्रिल महिना सुरू झाला असून उन्हाचा तडाखा वाढत असल्याने परप्रांतातून सिरोंचा शहरात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिरोंचा हे तालुका मुख्यालय असल्याने तालुक्यातील शेकडो नागरिक दररोज तहसील कार्यालय, पंचायत समिती, बसस्थानकात येत असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्यासाठी पाणी आवश्यक असते. सामान्य नागरिक वीस रुपये प्रति लिटर पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाहीत. यामुळे प्रवासी, नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. ग्राम पंचायत असताना उन्हाळ्यात दरवर्षी बसस्थानक परिसरात पाणपोई लावत होते. या पाणपोईमुळे सामान्य नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत होते. मात्र नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पाणपोई लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तिन्ही नद्यांवर पुलाची निर्मिती झाल्याने शहरात नागरिकांची वर्दळ वाढली असून बसस्थानक परिसरात यावर्षी पाणपोई सुरू न केल्याने सामान्य नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
बसस्थानकात नगरपंचायतने पाणपोई सुरू करावी : रवी सल्लम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:38 AM