चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार लक्ष वेधूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरातील शिक्षक काॅलनीतील रस्त्यांवर अपघात हाेऊन जीवितहानी झाल्यास नगरपंचायत प्रशासन जबाबदारी स्वीकारणार काय? चामाेर्शी शहराच्या हनुमाननगरातील शिक्षक कॉलनीतील अनेक रस्ते मागील तीन महिन्यांपासून दुरस्थेत आहेत. पावसामुळे रस्त्यावर जवळपास एक फुटाचे खड्डे तयार झाले आहेत. तरी प्रशासनाकडून अशा खड्ड्यांची दखल घेतली जात नाही किंवा दुरुस्ती केली जात नाही. खराब रस्त्यांमुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी नगरपंचायतचा जणू काही खेळ सुरू आहे. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संपूर्ण जबाबदारी नगरपंचायत स्वीकारणार काय? त्यामुळे प्रशासनाने लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी.
विजय काेमेरवार, चामाेर्शी
===Photopath===
240621\img-20210624-wa0059.jpg
===Caption===
हनुमान नगरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची मागणी