शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

आसरअल्लीत सापडलेल्या माशावर नागपुरात संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2016 2:21 AM

सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली परिसरात जानेवारी महिन्यात सापडलेल्या माशावर इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स नागपूरचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख तथा अभ्यासक ..

राजेंद्र तिजारे यांची माहिती : एलिगेटर असल्याचा अभ्यासकांचा दावागडचिरोली : सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली परिसरात जानेवारी महिन्यात सापडलेल्या माशावर इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स नागपूरचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख तथा अभ्यासक प्रा. डॉ. राजेंद्र तिजारे यांनी दीर्घ अभ्यास करून हा मासा एलिगेटर असल्याचे स्पष्ट केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता या दोन मोठ्या नद्या आहे. या नद्यांमध्ये विविध प्रजातीचे प्राणी, मासे आहेत. जानेवारी महिन्यात आसरअल्ली येथे सापडलेल्या माशाचे जीवशास्त्रीय नाव अटऱ्याक्टोस्टीअस स्पाचूला असे असून या माशाचा जबडा रूंद, चपटा असून वरच्या जबड्यातील दात हे अतिशय तीक्ष्ण असतात. हे दात दोन ओळीमध्ये असतात. त्यामुळे याला एलिगेटर फिश असे नाव दिल्या गेलेले आहेत. या माशाची पूर्ण वाढ झालेली नसल्यामुळे त्यांच्या जबड्यात दातांची दुसरी ओळ अपूर्णावस्थेत आहे. हा एक प्राचीन मासा असून याला लिविंग फॉसील (जिवंत जीवाश्म) असेही संबोधल्या जाते. अशा प्रकारचे गुण वैशिष्ट्ये हे क्रिट्याशिअस पीरिअड मधील माशामध्ये पाहायला मिळतात. सद्य:स्थितीत या माशांचे भारतामध्ये अस्तित्व नाही. केवळ अक्व्यरिअम फिश म्हणून याचा वापर केला जातो. परंतु अमेरिकेच्या दक्षिणोत्तर व मेक्सिकोमधील गोड्या पाण्याचे तलाव, नद्या अथवा खाडीचे पाणी यामध्ये या माशांचे वास्तव्य आढळते. सदर मासा लेपिसोस्टीफोर्मीस या वर्गात येत असून पूर्वी या माशाचे नाव ‘लेपीसोस्टीअस स्पाचुला’ असे होते. परंतु १९७४ मध्ये या माशाचे नाव बदलून अटऱ्याक्टोस्टीअस स्पाचुला असे ठेवण्यात आले. जीवाश्मांचा अभ्यास केला असता असे आढळले की, युरोपमध्ये क्रिट्याशिअस व ओलिगोसीन कालखंडात, भारत आणि आफ्रिका या देशात या माशाचे अस्तित्व होते. पुढे हा मासा या भागातून नामशेष झाला. आता केवळ अमेरिकेच्या काही भागात या माशाचे वास्तव्य आहेत.हा मासा पाणी व हवेत दोन्ही प्रकारे श्वासोच्छवास करू शकतो. त्यामुळे कमी पाण्यातसुध्दा हा मासा फार काळ जिवंत राहू शकतो.या माशांचा प्रजनन काळ साधारणत: एप्रिल ते जून या महिन्यात असतो. एका प्रजनन हंगामात जवळजवळ दीड लाख अंडी घालतो. अंडी चिकट व लाल रंगाचे असून पाण्यातील वनस्पतींना सदर अंडी चिकटलेली असतात. चुकून मनुष्याकडून या अंडीचे सेवन झाले तर विषबाधा होण्याचा धोका असतो. सदर मासा हा पाण्यामध्ये दबा धरून बसतो व भक्ष्यावर अचानक हल्ला चढवितो. या माशाचे भक्ष्य पाण्यातील इतर प्रकारचे मासे, सस्तन प्राणी व पाणपक्षी आहे. कदाचित अक्वारिअमचा छंद जोपासणाऱ्यापैकी कुणीतरी या माशाला नदीत सोडलेले असावे व हा मासा गोदावरी मार्ग आसरअल्ली भागात आलेला असावा, असा डॉ. तिजारे यांचा दावा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)