लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/भामरागड/धानोरा/ : नक्षल सप्ताहाच्या दुसºया दिवशी पोलीस पथकांनी भामरागड तालुक्यात नक्षल्यांनी बनविलेली दोन स्मारके उद्ध्वस्त केली. याशिवाय नक्षल गावबंदी करीत १३ बंदुका पोलिसांच्या सुपूर्द केल्या.यावर्षी नक्षल्यांकडून २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान पाळल्या जात असलेल्या नक्षल सप्ताहाला नागरिकांकडून विरोध होताना दिसत आहे. नक्षल्यांविरोधात आदिवासी बांधव रस्त्यावर उतरताना दिसत आहे. याचबरोबर पोलीस जवानांचेही नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी उभारण्यात आलेले नक्षल स्मारक जिल्हा पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी उद्ध्वस्त केले. त्यामध्ये पोमके धोडराज हद्दीतील मौजा पेनगुंडा येथील नक्षल स्मारक व पोमके कोठी हद्दीतील तुमरकोडी-तोयनार येथील नक्षल स्मारकाचा समावेश आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने भामरागडचे प्रभारी अधिकारी राजरत्न खैरनार व इतर कर्मचाºयांनी नक्षलविरोधी अभियानादरम्यान तसेच जनसंपर्क बैठकीच्या माध्यमातून गावातील लोकांची भेट घेऊन ग्रामस्थांना नक्षल गावबंदी योजना व नवजीवन योजनेची माहिती दिली. तसेच त्यांनी राबविलेल्या कम्युनिटी पोलिसिंगला प्रतिसाद देत विविध गावातील ग्रामस्थांनी नक्षल चळवळीला विरोध दर्शवत आपल्याकडील भरमार बंदुका शनिवारी पोलिसांकडे स्वाधीन केल्या.सदर कार्यक्रमात ग्रामस्थांनी त्यांना नक्षलवाद्यांपासून होणाºया त्रासाला वाचा फोडली. नक्षलवाद्यांनी आजवर दिलेल्या त्रासाला कंटाळून सदर ग्रामस्थांनी एकमताने नक्षल गावबंदी योजना आपआपल्या गावात राबविण्याचा निर्धार केला. नक्षल गावबंदी योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकारी, कर्मचारी यांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे फोदेवाडा, लस्कर, हितापाडी, मोरडपार, आलदंडी या अतिसंवेदनशील गावातील १३ ग्रामस्थांनी पोलिसांकडे स्वेच्छेने आपल्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे आणून दिल्या.सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी गावित, पोलीस निरिक्षक सांगळे, पोलीस उपनिरिक्षक दत्ता शेळके, हाळे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गावित यांनी गावकºयांचे अभिनंदन करीत त्यांना भरमार जवळ बाळगल्याने होणाºया नुकसानीवर मार्गदर्शन केले. यावर ग्रामस्थांनी भरमार हत्यार जवळ न बाळगण्याचा तसेच नक्षल्यांना विरोध करण्याचा निर्धार केला. कोरची येथे शहीद सप्ताहाच्या दुसºया दिवशी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसह शांतता रॅली काढण्यात आली.दुर्गम भागातील अनेक बसफेºयांवर परिणामनक्षल्यांच्या बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून एसटी महामंडळाच्या गडचिरोली आणि अहेरी आगारांनी काही बसफेºया पूर्णत: तर काही अंशत: बंद ठेवल्या आहेत. शुक्रवारी गडचिरोली-कोटगुल बसफेरी कोरचीपर्यंत सोडण्यात आली. कोटगुल-मानापूर बसफेरी मुरूमगावपर्यंत, गडचिरोली-विकासपल्ली ही बस घोटपर्यंत, गडचिरोली-मिचगाव फेरी मुरमाडीपर्यंत, गडचिरोली-रांगी फेरी बेलगावपर्यंत, गडचिरोली-पोटेगाव फेरी कुनघाडापर्यंत, आरमोरी-अंगारा फेरी वैरागडपर्यंत सोडण्यात आल्या. भामरागड-लाहेरी बस पोलिसांच्या परवानगीनंतरच सोडल्या जात होत्या. तसेच अहेरी आगारात अहेरी-भामरागड, अहेरी-कोठी, कसनपूर-गट्टा या बसफेºया बंद ठेवण्यात आल्या आहेत. एटापल्ली मुक्कामी असणाºया एटापल्ली-नागपूर व एटापल्ली-चिमूर बसफेºया बंद केल्या आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांसह एटापल्लीवासीयांना त्रास होत आहे.गावकºयांना हवा विकासआतापर्यंत नक्षलवाद्यांच्या बंदने काय साध्य झाले? आम्ही नक्षलवाद्यांचा बंद पाळून आमचा विकास का थांबवायचा? असा सवाल गावकºयांनी केला आहे. जे नक्षलवादी आपल्या आदिवासी बांधवांची हत्या करतात, जे आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात अशा नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही, अशी भावना आदिवासी दुर्गम भागातील गावकºयांनी व्यक्त केल्याचे धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी सांगितले.
नक्षल्यांची दोन स्मारके उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:31 PM
नक्षल सप्ताहाच्या दुसºया दिवशी पोलीस पथकांनी भामरागड तालुक्यात नक्षल्यांनी बनविलेली दोन स्मारके उद्ध्वस्त केली.
ठळक मुद्देपुन्हा १३ बंदुका जमा : नक्षल सप्ताहाच्या दुसºयाही दिवशी पोलिसांना यश