मनोरंजन वेडी हा नंदीबैलासोबत असलेल्या व्यक्तीच्या मांडीवर उभा राहून डान्स करून त्याला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मान डोलवून देतो, तसेच नंदीबैल हे भगवान शिवजीचे वाहक असल्याने त्याच्यावर लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे नंदीबैलाचा आशीर्वाद घेण्यासाठी खास करून महिलावर्ग गर्दी करतात व त्यांची समज अशी की, ज्या बाईला मूलबाळ होत नाही किंवा ज्याचे लग्नकार्य होत नाही किंवा मोठ्या आजाराने त्रस्त असेल, अशा लोकांना हा नंदीबैल आशीर्वाद देतो व त्यांच्या अडचणी दूर करतो.
या नंदीवाल्यांचे या नंदीबैलावरच जीवन अवलंबून असून, ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह यावरच करीत आहेत. तसेच यांची नवीन पिढीसुद्धा याच्यावरच अवलंबून राहणार असल्याचे नंदीबैलवाल्याने सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आम्हाला सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आरक्षण नाही, आमच्या मुलांना शिक्षणामध्ये कुठलेही आरक्षण किंवा कुठलीही सवलत नाही. त्यामुळे आम्हाला या नंदीबैलाबरोबर गावोगावी जाऊन, दोन ते तीन महिने राहून, गल्लोगल्ली फिरून नंदीबैलाची कर्तब, मनोरंजन, तमाशा लोकांना दाखवून मिळेल ते दान-दक्षिणा घेऊन आपल्या परिवाराचे पोट भरत असतो. त्यांचे पूर्वजही वर्षानुवर्ष बाहेर गावी राहून आपले काेरची परिवारांचे पोट भरायचे आणि हीच प्रथा आता या पिढीतील नंदीवाले करीत आहेत. या नंदीचे विशेष महत्त्व असे की, अशाप्रकारच्या नंदीबैलाचे टीव्ही सिरियल व मराठी, हिंदी चित्रपटात कार्यक्रम झाले असून, चित्रपटांमध्ये जान, बापू बिरू वाटेगावकर, नवरी मिळे नवऱ्याला अशा भरपूर ठिकाणी नंदीचे कार्यक्रम व कुंभमेळ्यामध्ये कार्यक्रम झालेले आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये जवळपास आठ महिने घरी राहावे लागल्यामुळे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत केली गेली नाही, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी आता कोरोनाची भीती न बाळगता ते आता आपल्या गावाबाहेर निघाले आहेत.